Team India England Tour वामिकासह विरानुष्का इंग्लंड दौऱ्यावर, फोटो व्हायरल

टीम इंडिया 18 ते 22 जून दरम्यान न्यूझीलंड विरुद्ध वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना खेळणार आहे. 

Updated: Jun 3, 2021, 09:58 AM IST
Team India England Tour वामिकासह विरानुष्का इंग्लंड दौऱ्यावर, फोटो व्हायरल

मुंबई: टीम इंडिया इंग्लंड दौऱ्यासाठी रवाना झाली आहे. टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीसोबत अनुष्का आणि वामिका इंग्लंड दौऱ्यावर जाणार का या सर्व चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे. अनुष्का आणि वामिका देखील टीम इंडियासोबत इंग्लंड दौऱ्यावर जात आहेत. या दोघांचाही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या फोटो व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर चाहत्यांनी काहीसा रागही व्यक्त केला आहे. 

टीम इंडियाचे खेळाडू आणि त्यांच्या पत्नी-गर्लफ्रेंडना इंग्लंड दौऱ्यावर जाण्याची परवानगी मिळाल्यानंतर आता खासगी विमानाने इंग्लंडला गेले आहेत. वामिकाला ज्या पद्धतीनं घेतलं आहे त्यावरून सोशल मीडियावर अनुष्कावर अनेकांनी राग व्यक्त केला. 

टीम इंडिया 18 ते 22 जून दरम्यान न्यूझीलंड विरुद्ध वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना खेळणार आहे. त्यानंतर 4 ऑगस्टपासून इंग्लंड विरुद्ध सीरिज आणि त्यानंतर सप्टेंबर ते ऑक्टोबर दरम्यान UAEमध्ये आयपीएलचे सामने होणार आहेत. त्यामुळे विराट कोहली अनुष्का आणि वामिकासोबत इंग्लंड दौऱ्यावर गेला आहे.

टीम इंडिया आज  लंडनमध्ये पोहोचणार असून तिथून साउथेम्प्टनला जाणार आहे. तिथे हॉटेलमध्ये त्यांना क्वारंटाइन करण्यात येईल. 10 दिवस क्वारंटाइनमध्ये राहिल्यानंतर सराव करू शकणार आहेत.