IND vs ENG: इंग्लंडची टीम सध्या भारत दौऱ्यावर आहे. भारताच्या ( India vs England Test Series ) दौऱ्यावर इंग्लिश टीमचा 5 सामन्यांची टेस्ट सिरीज खेळायची आहे. या सिरीजमध्ये दोन्ही टीम्सने 1-1 अशी बरोबरी साधली आहे. मात्र दुसऱ्या टेस्टनंतर इंग्लंडच्या टीमचे खेळाडू भारत देश सोडून निघून गेल्याचं समोर आलं. दरम्यान दुसऱ्या टेस्ट सामन्यानंतर काही खेळाडू त्यांच्या घरी जाण्याच्या मनस्थितीत होते, अशावेळी टीम इंडियाचे ( Team India ) कोच राहुल द्रविड यांच्याशी बोलणं झाल्याचं समजतंय.
इंग्लंडच्या क्रिकेट टीमने सिरीजची सुरुवात चांगली केली. पहिल्या टेस्टमध्ये इंग्लंडने ( India vs England Test Series ) टीम इंडियाचा 28 रन्सने पराभव केला. या विजयानंतर इंग्लंडच्या टीमने 1-0 अशी सिरीजमध्ये आघाडी घेतली होती. मात्र दुसरा सामना भारताने जिंकल्यानंतर सिरीजमध्ये 1-1 अशी बरोबरी साधली. इंग्लंडच्या आतापर्यंत ज्या प्रकारे खेळला आहे त्यावर प्रशिक्षक ब्रेंडन मॅक्युलम खूप समाधानी आहेत. मॅक्युलम म्हणाला की, गेल्या दोन टेस्ट सामन्यांमध्ये आम्ही खूप चांगले क्रिकेट खेळलो. आम्ही दुसरी कसोटी हरलो पण पहिला सामना जिंकण्यात यशस्वी झालो.
विशाखापट्टणममधील दुसऱ्या टेस्टनंतर इंग्लंडची टीम अबुधाबीला गेली होती. 15 फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या तिसऱ्या टेस्ट सामन्यापूर्वी ते 12 फेब्रुवारीला राजकोटला पोहोचणार आहेत. मॅक्युलम म्हणाला की, दोन वेगवेगळे टेस्ट सामने झाले आणि आमच्यासाठी ही उकाड्यापासून दूर जाण्यासाठी एक एक उत्तम संधी आहे. मी राहुल द्रविडशी बोलत होतो आणि त्याने सांगितले की, त्याचे सर्व खेळाडू त्यांच्या घरी जातायत. या खेळाडूंचं घर थोडं दूर आहे, म्हणून आम्ही अबू धाबी निवडलं आणि आम्ही कुटुंबासह आनंद घेऊ. आम्ही राजकोटला पोहोचू तेव्हा आम्ही मेहनत घेऊ.
दुसऱ्या टेस्टमध्ये झालेल्या पराभवानंतर इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने इंग्लंडचे खेळाडू आजारी पडले असल्याची माहिती दिली होती. दुसरा टेस्ट सामना गमावल्यानंतर इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने मीडियाशी संवाद साधला होता. यादरम्यान बेन स्टोक्सने सांगितलं की, टीममधील काही खेळाडू आजारी आहेत. सोमवारी फलंदाजी करणारे बेन फॉक्स, ऑली पोप आणि टॉम हार्टली पूर्णपणे फीट नव्हते. सोमवारी सकाळी उठल्यानंतर काही खेळाडूंना बरं वाटत नव्हते. आमच्या खेळाडूंना व्हायरसची लागण झाली.