प्रेक्षकांनी खचाखच भरलेल्या मैदानात 'तो' बसला गुडघ्यावर पण ती गेली पळून

लाईव्ह सामन्यात तरुणाला प्रपोज करणं पडलं महागात नेमकं काय घडलं तुम्हीच पाहा व्हिडीओ

Updated: Jul 21, 2021, 11:10 PM IST
प्रेक्षकांनी खचाखच भरलेल्या मैदानात 'तो' बसला गुडघ्यावर पण ती गेली पळून

मॅसेच्युसेट्स: लाईव्ह सामन्यात प्रपोज करण्याचं धाडस एका तरुणानं केलं. मात्र त्याला कुठे माहीत होतं की त्याच्या नशीबात काय लिहिलं आहे. सोशल मीडियावर सध्या एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक तरुण स्टेडियममध्ये लाईव्ह सामन्या दरम्यान तरुणीला प्रपोज अंगठी देऊन प्रपोज केलं. हा क्षण पाहून स्टेडियममध्ये सर्वजण आश्चर्यचकीत झाले. मॅच सोडून सर्वजण तरुणाला चिअर्स करू लागले. 

प्रेक्षकांनी खचाखच स्टेडियममध्ये गर्दी होती आणि या गर्दीतच तरुणीनं प्रपोज करण्याची संधी साधली. मॅसेच्युसेट्स इथे बेसबॉलचे सामने सुरू होते. त्यावेळी तरुण आणि तरुणीनं संघाला चिअर्स करण्यासाठी एकसारखे कपडे घातले होते. दोघंही संघाला चिअर्स करत होते. आजूबाजूला उत्साहाचं आनंदाचं वातावरण होता. हा आनंद वाढवण्यासाठी त्याने तरुणीला चक्क स्टेडियममध्ये गुडघ्यावर बसून प्रपोज केलं. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by What’s The Word? (@wtwmass)

इतका सगळा खटाटोप करून मात्र तरुणाच्या पदरात निराशाच पडली. या तरुणीनं त्याच्या आनंदावर विरजण पडलं. या तरुणीला आनंद झालाच नाही. उलट हा सगळा प्रकार पाहून ती नाराज झाली. तिच्या चेहऱ्यावरचा रंगच उडाला. तिने स्टेडियममधून बाहेर जाण्यासाठी लोकांना बाजूला होण्यास सांगितलं आणि तरुणीनं तिथून पळ काढला. स्टेडियममध्ये हा सगळा प्रकार झाल्यानंतर तरुण खूप नाराज झाला. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.