Virat Kohli महिला क्रिकेटवर फिदा! सकाळी पाच वाजता भेटण्यासाठी थेट रुममध्येच गेला अन्...

कोण आहे ती महिला क्रिकेटर तिच्यासाठी विराटने वेळ काळ पाहिला नाही!

Updated: Sep 12, 2022, 10:09 PM IST
Virat Kohli महिला क्रिकेटवर फिदा! सकाळी पाच वाजता भेटण्यासाठी थेट रुममध्येच गेला अन्... title=

Virat Kohli Meeting With English Cricketer : भारताचा स्टार खेळाडू विराट कोहलीचे फक्त भारतातच नाही तर जगभरात  असंख्य फॅन्स पाहत आहेत. 2011 नंतर विराट कोहलीने क्रिकेट विश्वात आपला ठसा उमटवला होता. 2014 साली विराट कोहली आणि इंग्लंडची माजी महिला क्रिकेटर सारा टेलर यांच्याबाबत चर्चा झाल्या होत्या. विराट कोहली साराला भेटण्यासाठी पहाटे पाच वाजता गेला होता. 

कसा झाला खुलासा  
विराट आणि साराच्या पहाटेच्या भेटीचा खुलासा सारा टेलरची सहकारी केट क्रॉस हिने केला होता. केट क्रॉसने एक ट्विट केलं होतं, ज्यामध्ये तिने सारा टेलरला टॅग करत विराट कोहलीला तुला भेटायचं होतं. या ट्विटसोबत क्रॉसने कोहलीचा एक फोटोही शेअर केला आहे, ज्यामध्ये तो इंग्लिश महिला क्रिकेटर्ससोबत हसताना दिसत आहे.

 

केट क्रॉसच्या म्हणण्यानुसार, विराट कोहली स्वतः सारा टेलरला भेटण्यासाठी पहाटे पाच वाजता तिच्या खोलीत पोहोचला होता. सारा टेलरने केट क्रॉसच्या ट्विटला उत्तर देताना म्हटलं होतं की, मला असा वेकअप कॉल कधीच आला नव्हता. सकाळी पाच वाजता नाष्टा करायला बोलावलं होतं. 

कोण आहे सारा टेलर 
इंग्लंडसाठी सारा टेलरने 126 एकदिवसीय सामन्यांमध्ये 4056 धावा, 90 टी-20 सामन्यांमध्ये 2177 धावा आणि 10 कसोटी सामन्यांमध्ये 300 धावा केल्या आहेत. तिन्ही फॉरमॅटमध्ये त्याने यष्टीमागे 232 विकेट घेतल्या आहे. 2019 मध्ये तणावामुळे साराने तिच्या क्रिकेट करिअरला अलविदा केलं होतं.