क्रिकेटमधली सगळ्यात खराब कामगिरी, १८ रनवर टीम ऑल आऊट

क्रिकेट हा बॅट्समनचा खेळ असल्याची टीका अनेक वर्षांपासून होत आहे.

Updated: Jul 24, 2018, 06:51 PM IST
क्रिकेटमधली सगळ्यात खराब कामगिरी, १८ रनवर टीम ऑल आऊट title=

लंडन : क्रिकेट हा बॅट्समनचा खेळ असल्याची टीका अनेक वर्षांपासून होत आहे. क्रिकेटमधली सगळ्यात खराब कामगिरी इंग्लंडमधल्या प्रथम श्रेणीमध्ये पाहायला मिळाली. शेफर्ड निम केंट क्रिकेट लीग मॅचमध्ये बेक्सले सीसी आणि बेकनहॅम सीसी या क्लबमध्ये मॅच झाली. या मॅचमध्ये बेकनहॅम सीसी ही टीम फक्त १८ रनवर ऑल आऊट झाली. बेकनहॅम सीसी ला फक्त ११.२ ओव्हर(४९ मिनीटं) एवढीच बॅटिंग करता आली. बेकनहॅम सीसीनं ठेवलेलं हे आव्हान बेक्सले सीसीनं १२ मिनिटांमध्ये एकही विकेट न गमावता पूर्ण केलं. स्कॉटलंडकडून ५७ वनडे खेळणाऱ्या कॅलम मॅकलिओडनं बेकनहॅम सीसीच्या सर्वाधिक ६ विकेट घेतल्या.

१५२ वर्षांच्या इतिहासातला बेकनहॅम सीसीचा सर्वात कमी स्कोअर आहे. बेकनहॅम सीसीच्या कर्णधारानं या मॅचमध्ये टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला होता. पण स्कोअरबोर्डवर ९ रन असतानाच टीमचे ४ बॅट्समन पॅव्हेलियनमध्ये पोहोचले होते. १२ रनवर बेकनहॅम सीसीचे ६ बॅट्समन आऊट झाले होते.

बेकनहॅम सीसीचे ५ खेळाडू शून्य रनवर आऊट झाले. तर तीन खेळाडूंनी सर्वाधिक ४ रन केल्या. कॅलम मॅकलिओडबरोबरच बेक्सले सीसीच्या जेसन बेननं १२ रन देऊन ४ विकेट घेतल्या.

१९ रनचा पाठलाग करताना क्रिस्टोफर लासनं नाबाद ४ आणि एडन गिग्सनं नाबाद १२ रन केल्या. बेक्सलेच्या टीमला ६ रन जादाच्या मिळाल्या. १९ रनचं लक्ष्य बेक्सले सीसीनं ३.३ ओव्हर आणि १२ मिनिटांमध्ये पूर्ण केलं.