विराटच्या मानसिकतेवर संघातील खेळाडूंचं वक्तव्य; तो स्वत:ला...

कोहलीच्या जुन्या टीममेट्सने कोहलीबद्दल मोठं विधान केलं आहे.

Updated: Mar 9, 2022, 12:18 PM IST
विराटच्या मानसिकतेवर संघातील खेळाडूंचं वक्तव्य; तो स्वत:ला... title=

मुंबई : क्रिकेटच्या महान खेळाडूंमध्ये आता विराट कोहलीचं नाव घेण्यात येतं. केवळ भारतंच नाही तर इतर देशांमध्येही विराटचे चाहते आहेत. विराटने आतापर्यंत त्याच्या फलंदाजीच्या जोरावर अनेक रेकॉर्ड केले आहेत. अशातच आता कोहलीच्या जुन्या टीममेट्सने कोहलीबद्दल मोठं विधान केलं आहे.

अंडर-19 वर्ल्डकप जिंकणारा कर्णधार ते जगातील अव्वल फलंदाज होण्यापर्यंत कोहलीने अनेक गोष्टींचा त्याग केला आहे. कोहलीचे अंडर-19 दिवसांतील सहकारी खेळाडू, प्रदीप सांगवान आणि तन्मय श्रीवास्तव यांनी कोहलीचा जोश आणि उत्साह याबाबत माहिती दिलीये.

प्रदीप सांगवानच्या म्हणण्यानुसार, आम्हाला विराटच्या खेळीमुळे माहिती होतं की, "तो एक दिवस भारतासाठी खेळणार. तो खूप खेळायचा आणि खूप रन्स करायचा. त्याची मानसिकता होती की, जर तो मोठ्या टीमसमोर स्कोर करतो तर तो टीम इंडियासाठी लवकर सिलेक्ट होऊ शकतो."

ते पुढे म्हणाले, जेव्हा तो मैदानाच्या आत असतो त्यावेळी तो कधीही हार मानत नाही. त्याला वाटतं की, तो एकटाच पुरेसा आहे आणि एकट्याने तो खेळून जिंकून देऊ शकतो. मी इथला राजा आहे आणि मी माझ्या टीमसाठी जिंकणार विराटच्या मनात असतं.

ड्रेसिंग रूममध्येही विराट वेगळ्या मूडमध्ये असतो. याठिकाणी तो अशा लोकांना सोबत घेतो जे त्याचे विनोद ऐकतील. आजूबाजूच्या वातावरण तो खूप हलंक-फुलकं ठेवतो. हे खूप गरजेचं आहे कारण, अनेकदा ड्रेसिंगरूममध्ये तणावपूर्ण वातावरण असतं, असंही विराटच्या सहकाऱ्याने सांगितलं आहे.