VIDEO : मैदानावर 'अनुष्का-अनुष्का'चे नारे, विराटनं दिलं असं प्रत्यूत्तर

हे दृश्य एका फॅननं आपल्या कॅमेऱ्यात कैद केलं

Updated: Oct 30, 2018, 01:46 PM IST
VIDEO : मैदानावर 'अनुष्का-अनुष्का'चे नारे, विराटनं दिलं असं प्रत्यूत्तर title=

मुंबई : गेल्या दोन मॅचमध्ये काहिशी मागे पडलेल्या भारतीय टीमनं ब्रेबॉर्न स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या चौथ्या मॅचमध्ये मात्र दमदार खेळी केली. टीम इंडियानं वेस्ट इंडिजला २२४ रन्सच्या मोठ्या अंतराच्या फरकानं धूळ चारली. वनडे क्रिकेटच्या इतिहासातील हा भारताची रनांच्या हिशोबानं तिसरा सर्वात मोठा विजय आहे. भारतासाठी रोहित शर्मा (१६२) आणि अंबाती रायडू (१००) यांनी शानदार खेळी खेळली. या मॅचमध्ये कॅप्टन विराट कोहली फार काही कमाल दाखवू शकला नाही. गेल्या तीन वन-डे मॅचमध्ये शतक ठोकणारा कोहली चौथ्या वन-डेमध्ये मात्र केवळ १६ रन्सवर आऊट झाला.

या दरम्यान मैदानावर अचानक एक गोष्ट घडली. टीम इंडिया मैदानावर फिल्डिंग करत असताना अचानक स्टेडियममध्ये बसलेल्या प्रेक्षकांनी 'अनुष्का-अनुष्का'चे नारे देणं सुरू केलं... 

यामुळे विराटलाही कदाचित आश्चर्य वाटलं असेल... पण त्यानं फॅन्सच्या या क्रियेवर प्रतिक्रिया म्हणून हसतमुखानं थम्सअप केला... 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Crowd chanting Anushka...Anushka.... and Virat Kohli gave thums up to a crowd . . . FOLLOW @virat.kohlifans

A post shared by Virat Kohli - FC (@virat.kohlifans) on

हे दृश्य एका फॅननं आपल्या कॅमेऱ्यात कैद केलं... आणि सोशल मीडियावरही शेअर केलंय. 

सोशल मीडियावर हा व्हिडिओ तेजीनं व्हायरल होतोय.

दरम्यान, टीम इंडियानं मुंबई एकदिवसीय सामन्यात विंडीजवर भारतानं २२४ धावांनी मात केली. भारतीय गोलंदाजांसमोर विंडीज फलंदाजांनी अक्षरक्ष: लोटांगण घातलं. खलिल अहमद आणि कुलदिप यादवनं सर्वाधिक तीन-तीन फलंदाज बाद केले. विंडीजचा डावा भारतीय गोलंदाजांनी १५३ धावांतच आटोपला. या विजयासह भारतानं पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत २-१ नं आघाडी घेतली. दरम्यान, भारतानं नाणेफेक जिंकत पहिल्यांदा फलंदाजीचा निर्णय घेतला. रोहित शर्माच्या १६२ धावांच्या आणि अंबाती रायडूच्या शतकाच्या जोरावर भारतानं विंडीजसमोर ३७८ धावांचं आव्हान ठेवलं होतं. हे आव्हान पार करताना कॅरेबियन संघाला २०० धावाही करता आल्या नाहीत.