दिल्ली कॅपिटलला धक्का, वेगवान गोलंदाज इशांत शर्माला दुखापत

 दिल्ली आणि पंजाब यांच्यात सामना रंगणार 

Updated: Sep 20, 2020, 05:51 PM IST
दिल्ली कॅपिटलला धक्का, वेगवान गोलंदाज इशांत शर्माला दुखापत title=

दुबई : इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) मध्ये आज दिल्ली आणि पंजाब यांच्यात सामना रंगणार आहे. पण त्याआधी दिल्ली कॅपिटलचा मुख्य वेगवान गोलंदाज इशांत शर्माला दुखापत झाली आहे. त्यामुळे तो पहिल्या सामन्यात खेळणार की नाही याबाबत शंका आहे.

दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल आणि किंग्ज इलेव्हन पंजाब यांच्यात आज आयपीएल सीजनमधला दुसरा सामना खेळला जाणार आहे,

इशांतच्या पाठीला दुखापत झाल्याची माहिती आहे. यापूर्वीही त्याला अनेकदा दुखापत झाली आहे.

दिल्लीच्या संघात इशांत शिवाय हर्षल पटेल, मोहित शर्मा आणि अवेश खान हे भारतीय वेगवान गोलंदाज आहेत. इशांतच्या अनुपस्थितीत या तिघांपैकी एकाला खेळायची संधी मिळू शकते.