फिफा अंडर 17 वर्ल्ड कप : सलामीच्या सामन्यात भारताचा पराभव

फिफा अंडर 17 वर्ल्ड कपमध्ये भारताला पहिल्याच लढतीत पराभवाला सामोर जावं लागलय. दिल्लीतल्या जवाहलाल नेहरु स्टेडियमवर रंगलेल्या अमेरिकेकडून भारताला  3-0 नं पराभव पत्करावा लागला. अमेरिकेनं मुकाबल्याच्या सुरवातीपासूनच आक्रमक पवित्रा धारण केला. सुरुवातीला दहा मिनिटं जवळपास बॉ़ल हा अमेरिकेच्या ताब्यातच राहीला. 

Updated: Oct 6, 2017, 10:57 PM IST
फिफा अंडर 17 वर्ल्ड कप : सलामीच्या सामन्यात भारताचा पराभव title=

नवी दिल्ली : फिफा अंडर 17 वर्ल्ड कपमध्ये भारताला पहिल्याच लढतीत पराभवाला सामोर जावं लागलय. दिल्लीतल्या जवाहलाल नेहरु स्टेडियमवर रंगलेल्या अमेरिकेकडून भारताला  3-0 नं पराभव पत्करावा लागला. अमेरिकेनं मुकाबल्याच्या सुरवातीपासूनच आक्रमक पवित्रा धारण केला. सुरुवातीला दहा मिनिटं जवळपास बॉ़ल हा अमेरिकेच्या ताब्यातच राहीला. 

अमेरिकेच्या आक्रमणांना परतवण्यात भारतीय खेळाडूंना अपयश आलं. 30व्या मिनिटाला भारताचा खेळाडू धीरजच्या चुकीमुळे अमेरिकेला पेनल्टी मिळाली. याचा फायदा उठवत जोशुआ सर्जंटनं गोल करत अमेरीकेला खातं उघडून दिलं. यानंतर भारतानं आक्रमक पवित्रा धारण केला खरा मात्र गोल करण्यात त्यांना यश आलं नाही. 

यानंतर 51व्या मिनिटाला ख्रिस्टोफर डर्किननं गोल करत अमेरिकेला 2-0नं आघाडी मिळवून दिली. तर 81व्या मिनिटाला एँड्रयू कार्ल्टननं गोल करत अमेरिकेला 3-0नं आघाडी मिळवून दिली. भारताला 56व्या मिनिटाला गोल करण्याची संधी चालून आली होती. मात्र भारताला गोल काही करता आला नाही.  आता भारताचा आगामी मुकाबला कोलंबियाशी होणार आहे. या लढतीला पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही हजेरी लावली होती. मॅचपूर्वी मोदींच्या हस्ते काही दिग्गज खेळाडूंचा सत्कार करण्यात आला.