अखेर आथिसोबतच्या नात्याला के.एल.राहुलकडून कबुली, म्हणाला...

के एल राहुलने आथियासोबतचा एक फोटो शेअर केला आहे.

Updated: Nov 6, 2021, 09:34 AM IST
अखेर आथिसोबतच्या नात्याला के.एल.राहुलकडून कबुली, म्हणाला... title=

दुबई : काल स्कॉटलंट विरूद्ध झालेल्या सामन्यात टीम इंडियाचा फलंदाज के. एल. राहुलने दमदार खेळी केली. दरम्यान त्याची ही खेळी पाहण्यासाठी जवळची मैत्रीण आथिया शेट्टी देखील मैदानात उपस्थित होती. या मॅचनंतर राहुलने त्याचं आणि आथियाचं नातं सार्वजनिकरित्या मान्य ही केलं आहे. यावेळी के एल राहुलने आथियासोबतचा एक फोटो शेअर केला आहे.

राहुलने ट्विटरवर एक पोस्ट केली आहे आपल्या प्रेमाची कबुली दिली. राहुलने इन्स्टाग्रामवर एक फोटो पोस्ट करत अथियाला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. या फोटोच्या कॅप्शनच्या माध्यमातून त्याने दोघांचं नातं जगासमोर आणलं आहे.

नुकताच आथिया शेट्टीचा वाढदिवस झाला. या निमित्ताने राहुलने आथियोसोबतचे दोन फोटो ट्विटरवर शेअर केले आहेत. या फोटोंच्या कॅप्शनमध्ये त्याने “हॅपी बर्थ डे माय लव्ह,” असं म्हटलं आहे. यामुळे दोघांच्याही नात्यांवर शिक्कामोर्तब झालं आहे. 

दरम्यान यावर अभिनेत्री आथिया शेट्टीने देखील रिप्लाय केला आहे. तिने व्हाईट हार्ट आणि ग्लोबल वर्ल्डचं इमोजी पोस्ट केलं आहे. इतकंच नाही तर अनुष्का शर्माने या पोस्टवर हार्ट इमोजीसह कमेंटही केलीये आहे. या पोस्टवर क्रिकेटर हार्दिक पांड्या, सानिया मिर्झा सयामी खेर, अहान शेट्टी यांसारख्या अनेक मोठ्या सेलिब्रिटींनी या पोस्टवर कमेंट करून आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.