आमच्या फलंदाजांना काय सल्ला द्याल? बांगलादेश खेळाडूच्या प्रश्नावर गावसकरांनी दिलं भन्नाट उत्तर, 'भारतीय म्हणून...'

India vs Bangladesh: भारताविरोधातील दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पाचव्या दिवसाचा खेळ सुरु झाला तेव्हा बांगलादेशची स्थिती 26 धावांवर 2 गडी बाद होती. यानंतर मात्र त्यांचा संघ पत्त्याप्रमाणे कोसळला. एका क्षणी तर फक्त 3 धावांवर 4 गडी बाद झाले.   

शिवराज यादव | Updated: Oct 2, 2024, 12:07 PM IST
आमच्या फलंदाजांना काय सल्ला द्याल? बांगलादेश खेळाडूच्या प्रश्नावर गावसकरांनी दिलं भन्नाट उत्तर, 'भारतीय म्हणून...' title=

India vs Bangladesh: बांगलादेशविरोधातील दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने वर्चस्व राखत अत्यंत सहजपणे हा सामना जिंकला. भारतीय संघाने 7 गडी राखून सामन्यासह मालिकाही जिंकली. पाचव्या दिवशी भारताने एक डाव राखून सामना आपल्या खिशात घातला. दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पाचव्या दिवसाचा खेळ सुरु झाला तेव्हा बांगलादेशची स्थिती 26 धावांवर 2 गडी बाद होती. यानंतर मात्र त्यांचा संघ पत्त्याप्रमाणे कोसळला. एका क्षणी तर फक्त 3 धावांवर 4 गडी बाद झाले. बांगलादेशने 94 धावांची आघाडी घेतली होती. पण भारतीय संघाने सहजपणे हे लक्ष्य गाठलं. 

पाचव्या दिवसाचा खेळ सुरु असताना भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार सुनील गावसकर यांना बांगलादेशचा माजी खेळाडू अथर अली याने तुम्ही बांगलादेशच्या फलंदाजांना काय सल्ला द्याल असं विचारलं. त्यावर सुनील गावसकरांना दिलेल्या उत्तराने सर्वांच्या नजरा वळल्या. "एक भारतीय म्हणून मी सांगेन की लवकर बाद व्हा," असं सुनील गावसकर उपहासात्मकपणे म्हणाले.

कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमवर भारताने बांगलादेशविरोधातील मालिका 2-0 जिंकत जागतिक कसोटी चॅम्पियनशिप (WTC) क्रमवारीत आपलं स्थान आणखी मजबूत केलं आहे. 7 गडी राखून विजय मिळवत भारताने त्यांच्या गुणांची टक्केवारी प्रभावी 74.24 इतकी सुधारली तर बांगलादेशच्या पराभवामुळे ते 34.38 टक्क्यांसह सातव्या स्थानावर घसरले. दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंडला मागे टाकण्यात आलं आहे, जे अनुक्रमे पाचव्या आणि सहाव्या स्थानावर आहेत.

62.50 गुणांच्या टक्केवारीसह ऑस्ट्रेलिया 12 सामन्यातील 8 विजयांसह दुसऱ्या स्थानावर आहे, त्यानंतर श्रीलंका (तिसऱ्या), इंग्लंड (चौथ्या) अनुक्रमे 55.56 आणि 42.19 पॉइंट टक्केवारीसह आहेत.

पावसाने व्यत्यय आणल्यानंतरही भारताने धडाकेबाज फलंदाजी करत दुसरा कसोटी सामना जिंकला. फक्त अडीच दिवसात भारताने या सामन्याचा निकाल लावला. भारतीय फलंदाजांनी टी-20 प्रमाणे फलंदाजी केली. यशस्वी जैस्वाल (51 चेंडूत 72) आणि केएल राहुल (43 चेंडूत 68) यांच्या नेतृत्वाखाली भारताने कसोटी क्रिकेट इतिहासातील सर्वात जलद संघ धावसंख्या उभारली. 34.4 षटकांमध्ये, भारताने कसोटी इतिहासातील सर्वात जलद 50, 100, 150, 200 आणि 250 धावा केल्या. भारताने 285/9 वर डाव घोषित केला आणि पहिल्या डावात 52 धावांची आघाडी घेतली.

चौथ्या दिवशी उशिरा बांगलादेश संघ फलंदाजीसाठी उतरला असताना संकटात सापडला. रविचंद्रन अश्विनने शेवटच्या षटकांमध्ये दोन विकेट्स घेतले. रवींद्र जाडेजा आणि बुमराहनेही बांगलादेशी फलंदाजांना तंबूत धाडलं आणि 146 धावांवर संपूर्ण संघ बाद झाला. यानंतर भारताला सामना जिंकण्यासाठी 96 धावांची गरज होती. 

कमी धावांचं लक्ष्य असतानाही भारताने अंतिम क्षणी धडाकेबाज फलंदाजी केली. जैसवालने अवघ्या 43 चेंडूत अर्धशतक झळकावले. 51 धावांवर बाद झाल्यानंतर, विराट कोहलीने जबाबदारी स्वीकारली आणि ऋषभ पंतच्या बरोबरीने खेळ पूर्ण केला. 

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x