'कॅमेऱ्यासमोर नाव घेणार नाही पण...'; प्रविण कुमारचे सिनियर खेळाडूवर सनसनाटी आरोप, म्हणाला 'हमाम में सब...'

Praveen Kumar Statement : प्रविण कुमारने एका मुलाखतीत बोलताना सिनियर खेळाडूंवर गंभीर आरोप लगावले आहेत. त्यामुळे आता क्रिडाविश्वात खळबळ उडाल्याचं पहायला मिळतंय.

सौरभ तळेकर | Updated: Jan 7, 2024, 05:15 PM IST
'कॅमेऱ्यासमोर नाव घेणार नाही पण...'; प्रविण कुमारचे सिनियर खेळाडूवर सनसनाटी आरोप, म्हणाला 'हमाम में सब...' title=
Praveen Kumar accused Senior Player

Praveen Kumar accused Senior Player : आपल्या घातक स्विंग गोलंदाजीने अनेक दिग्गज फलंदाजांना परतीचा रस्ता दाखवणाऱ्या प्रविण कुमारला (Praveen Kumar) आजही अनेकजण विसरले नसतील. हाताचा पिळा घालणाऱ्या बॉलिंग अॅक्शनमुळे प्रविण नेहमी लक्षात राहतो. त्याच्या इनस्विंग गोलंदाजीचा धार आजही कोणत्याही गोलंदाजाला जमली नाही. अशाच प्रविण कुमारने एका मुलाखतीत बोलताना सिनियर खेळाडूंवर गंभीर आरोप लगावले आहेत. त्यामुळे आता क्रिडाविश्वात खळबळ उडाल्याचं पहायला मिळतंय.

काय म्हणाला Praveen Kumar ?

माझ्या काही सिनियर खेळाडूंनी मला सांगितलं होतं की ड्रिंक करायची नाही, असं प्रविण कुमारने लल्लनटॉपच्या मुलाखतीत बोलताना सांगितलं. त्यावेळी प्रविण कुमारने सिनियर खेळाडूवर गंभीर आरोप केले आहेत. मला सांगण्यात आलं होतं की पीके ड्रिंक करायची नाही, हे करायचं नाही, ते करायचं नाही.. सिनियर खेळाडू होते, ते सगळं करत होते. मात्र, नाव माझं खराब करत होते. पीके दारु पितो अन् इतर गोष्टी सांगितल्या जात होत्या. हमाम में सब नंगे हैं, असं म्हणत प्रविण कुमारने टोला लगावला आहे.

सगळे सिनियर खेळाडू आहेत, आम्ही लहान आहोत, जसं लहान मूल ठेवतो, तसं सगळ्यांना ठेवतात. पण कुणीतरी असा आहे की जो बदनामी करतो, मला त्याचं नाव कॅमेऱ्यात घ्यायचं नाही, सगळ्यांना माहिती आहे की, बदनामी कोणी केली? अशी प्रतिमा तयार केली गेली की होय खरंच तो दारु घेतो, असं तयार केलं गेलं, असा आरोप देखील प्रविण कुमारने केला आहे.

दरम्यान, 2011 च्या वर्ल्ड कपमध्ये माझ्या कोपराला दुखापत झाली होती. कोपराचं हाड वाढलं होतं. सुरुवातीला मला वाटलं ते जाऊ द्या, ही एक मोठी स्पर्धा आहे. अनेक खेळाडू मोठ्या टूर्नामेंटसाठी दुखापती लपवतात, मलाही तेच वाटत होतं. संदीप पाटील सर त्यावेळी एनसीएचे संचालक होते, ही वेळ डोक्याने विचार करायची वेळ आहे, मनाने नाही, असं त्यांनी मला समजवलं. त्यामुळे मला वर्ल्ड कप खेळता आला नाही, असंही प्रविण कुमारने म्हटलं आहे.

तुम्हाला माहिती असेल तर, प्रवीण कुमारने टीम इंडियासाठी 6 कसोटी खेळल्या आहेत. ज्यात त्याने 27 विकेट घेतल्या आहेत. याशिवाय त्याने 68 एकदिवसीय सामन्यांमध्ये 77 विकेट्स घेतल्या आहेत, तर 10 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये त्याने 8 विकेट घेतल्या आहेत.