India vs Pakistan : भारत आणि पाकिस्तानचा (India vs Pakistan) संघ पुन्हा एकदा आमने-सामने येणार आहेत. आशिया चषक 2022 (Asia Cup 2022) मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना 28 ऑगस्ट रोजी होणार आहे. 27 ऑगस्टपासून आशिया कप स्पर्धेला सुरुवात होणार आहे. दरम्यान, आशिया कपमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात दोन सामने होण्याची शक्यता आहे.
साखळी टप्प्यात भारत आणि पाकिस्तान (Ind vs Pak) यांच्यात सामना होईल. त्यानंतर दोन्ही संघ सुपर 4 मध्ये पोहच्याल्यानंतर देखील आमने-सामने येऊ शकतात. त्यामुळे आशिया कपमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात दोन सामने होण्याची शक्यता आहे.
आयसीसी टी20 वर्ल्ड कप 2021 नंतर पहिल्यांदाच भारत आणि पाकिस्तान आंतरराष्ट्रीय सामन्यात समोरा समोर येणार आहेत. टी20 वर्ल्ड कप 2021 मध्ये भारताला 10 विकेटने मानहाणीकारक पराभव स्विकारावा लागला होता.
वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदीने त्या सामन्यामध्ये चार षटकामंध्ये 31 धावा देऊन चार बळी घेतले होते. आफ्रिदिने केएल राहुल, रोहित शर्मा आणि विराट कोहलीला पॅव्हेलियनमध्ये पाठवले होते.
पाकिस्तानचा माजी खेळाडू दानिश कनेरियाने (Danish Kaneria)शाहिन आफ्रिदीच्या गोलंदाजीविरुद्ध खेळण्यासाठी विराट आणि रोहितला खास सल्ला दिला आहे.
एका यूट्यूब चॅनलवर बोलताना दानिशने सांगितले की रोहित आणि विराटने आफ्रिदीच्या फुलर बॉल्सचा कसा सामना केला पाहिजे. "शाहीन शाह आफ्रिदीला घाबरण्याची गरज नाही, कारण विराट कोहली आणि रोहित शर्मा हे जागतिक दर्जाचे फलंदाज आहेत. त्यांना फक्त हे लक्षात ठेवावे लागेल की आफ्रिदी फुलर बॉल्सची रणनीती घेऊन उतरेल. असा चेंडू काळजीपूर्वक खेळावा हे दोघांनाही लक्षात ठेवावे लागेल", असे दानिशने म्हटले आहे.
"शाहिनच्या गोलंदाजीवर सुर्यकुमार यादवचे स्क्वेअर लेगच्या वरुन खेळले गेलेले शॉट महत्त्वाचे ठरणार आहेत," असेही दानिश कनेरियाने म्हटले आहे.