भारत-मालदीव वादात पाकिस्तानी खेळाडूची उडी; फक्त एका शब्दाचं ट्विट, पोस्ट व्हायरल

भारत आणि मालदीवमधील वादाने सध्या संपूर्ण जगाचं लक्ष वेधलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींवरील आक्षेपार्ह टीकेचा फक्त भारतच नाही तर जगभरातून निषेध केला जात आहे. अनेक देशांमधून नरेंद्र मोदींना समर्थन मिळत आहे.   

शिवराज यादव | Updated: Jan 9, 2024, 05:52 PM IST
भारत-मालदीव वादात पाकिस्तानी खेळाडूची उडी; फक्त एका शब्दाचं ट्विट, पोस्ट व्हायरल title=

भारत आणि मालदीवमधील वादाने सध्या संपूर्ण जगाचं लक्ष वेधलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करणाऱ्या तिन्ही मंत्र्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. पण या कारवाईनंतरही भारतीयांचा संताप मात्र कमी झालेला नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींवरील आक्षेपार्ह टीकेचा फक्त भारतच नाही तर जगभरातून निषेध केला जात आहे. अनेक देशांमधून नरेंद्र मोदींना समर्थन मिळत आहे. पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी खेळाडू दानिश कनेरियानेही नरेंद्र मोदींच्या समर्थनार्थ पोस्ट शेअर केली आहे. एक्सवर शेअर केलेल्या पोस्टमधून दिनेश कनेरियाने फक्त एक शब्द आणि इमोजीत आपल्या भावना मांडल्या आहेत. 

दिनेश कनेरियाने एक्सवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये लक्षद्वीप लिहिलं असून सोबत आगीचा इमोजी शेअर केला आहे. थोडक्यात कनेरियाने आपल्या पोस्टमध्ये लक्षद्वीने मालदीवमध्ये आग लागल्याचं म्हटलं आहे. 

भारतीय क्रिकेटर्सनीही सुनावलं

भारत-मालदीव वादावर बॉलिवूडसह क्रीडा जगतातील अनेक दिग्गजांनी आपलं मत मांडत निषेध व्यक्त केला आहे. सचिन तेंडुलकर, वीरेंद्र सेहवाग, सुरेश रैना, इरफान पठाण, हार्दिक पांड्या आणि शिखर धवनसह अनेक खेळाडूंचं नाव यात जोडलं गेलं आहे. सुरेश रैनाने पोस्टमधून आपला संताप व्यक्त केला असून भारतीयांप्रती द्वेष आणि वांशिक टिप्पणी करणं फार खेदजनक असल्याचं म्हटलं आहे. 

मालदीवच्या अर्थव्यवस्थेत भारतीयांची भूमिका फार महत्त्वाची असल्याचं रैनाने अधोरेखित केलं. तसंच हार्दिक पांड्याने आता पुढच्या सुट्टीला आपण लक्षद्वीपला जाणार असल्याचं म्हटलं आहे. 

नेमका वाद काय आहे?

नरेंद्र मोदी यांनी लक्षद्धीपमधील पर्यटन वाढवण्याच्या हेतूने केलेल्या दौऱ्यानंतर मालदीवमधील तीन मंत्र्यांनी त्यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केलं. टीका झाल्यानंतर त्यांनी या पोस्ट डिलीट केल्या होत्या. पण वाद इतका वाढला होता की, तिन्ही मंत्री मरियम शिउना, माल्शा शरीफ आणि महजून माशिद यांना निलंबित करण्यात आलं होतं. 

मालदीवमध्ये भारतीय पर्यटकांची संख्या सर्वाधिक

भारतातून मोठ्या संख्येने पर्यक मालदीवमध्ये जात असतात. 2023 मध्ये एकूण 17 लाख 57 हजार 939 पर्यटक मालदीवला गेले होते. यातील सर्वाधिक संख्या भारतीयांची होता. भारतातील 2 लाख 9 हजार 198 पर्यटक तिथे गेले होते. भारतानंतर रशिया आणि चीनमधील पर्यटकांची संख्या सर्वाधिक आहे. 

यापूर्वी 2022 मध्ये 2.41 लाख भारतीय मालदीवला भेट देण्यासाठी गेले होते, 2021 मध्ये 2.91 लाख आणि 2020 मध्ये कोरोना महामारीच्या काळातही 63000 भारतीय मालदीवला भेट देण्यासाठी गेले होते.