close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

फ्रेंच ओपन : टेनिसप्रेमींसाठी आज अनोखी मेजवानी

फ्रेंच ओपन स्पर्धेत आज टेनिसप्रेमींसाठी अनोखी मेजवनी असणार आहे...क्ले कोर्टचा बादशहा म्हणून प्रसिद्ध असणारा राफेल नदाल, नोवाक जोकोविच, स्वित्झर्लंडचा स्टॅनलिस वावरिंका, अव्वल सीडेड अँडी मरे हे चारही टॉपचे खेळाडू आज वेगवेगळ्या सामन्यांमध्ये खेळणार आहेत.  

Updated: Jun 7, 2017, 07:45 AM IST
फ्रेंच ओपन : टेनिसप्रेमींसाठी आज अनोखी मेजवानी

पॅरिस : फ्रेंच ओपन स्पर्धेत आज टेनिसप्रेमींसाठी अनोखी मेजवनी असणार आहे...क्ले कोर्टचा बादशहा म्हणून प्रसिद्ध असणारा राफेल नदाल, नोवाक जोकोविच, स्वित्झर्लंडचा स्टॅनलिस वावरिंका, अव्वल सीडेड अँडी मरे हे चारही टॉपचे खेळाडू आज वेगवेगळ्या सामन्यांमध्ये खेळणार आहेत.  

फ्रेंच ओपन पुरुष एकेरीचे चार उपउपांत्यफेरीचे सामने आज खेळवले जाणार आहेत. वेळापत्राकनुसार काल होणारे दोन सामने पावसामुळे होऊ शकले नाहीत. त्यामुळे आज चार सामने एकाच दिवशी खेळवण्यात येतील.

राफेल नदाल आणि पाबेलो कार्नेवो बुस्टा हे स्पॅनिश खेळाडू एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत, तर ऑस्ट्रियाच्या डॉमिनिक थिईमचा मुकाबला सर्बियन टेनिसपटू नोवाक जोकोविचशी होणार आहे... जपानचा केई निशिकोरी ब्रिटनच्या अव्वल सीडेड अँडी मरेशी दोन हात करेल... वावारिंकासमोर  क्रोएशियाच्या मरिन चिलीचचे आव्हान आहे.