T20 World Cup: 'स्टॉप क्लॉक'पासून 'रिझर्व डे'पर्यंत...; टी20 वर्ल्ड कपसाठी 'या' नियमांमध्ये झालेत बदल

T20 World Cup 2024 New Rules: ICC ने मेगा इव्हेंटसाठी नवीन नियमांची यादी तयार केलीये. T-20 वर्ल्डकप 2024 साठी ICC खूप कडक असल्याचं दिसून येतंय. कोणते नियम बदलले आहेत हे पाहूयात. 

सुरभि जगदीश | Updated: May 29, 2024, 08:13 AM IST
T20 World Cup: 'स्टॉप क्लॉक'पासून 'रिझर्व डे'पर्यंत...; टी20 वर्ल्ड कपसाठी 'या' नियमांमध्ये झालेत बदल title=

T20 World Cup 2024 New Rules: आयपीएल आता संपली असून खेळाडूंसह बीसीसीआय देखील वर्ल्डकप 2024 च्या तयारीला लागली आहे. आयसीसी टी-20 वर्ल्डकप 1 जूनपासून सुरू होणार आहे. ICC ने मेगा इव्हेंटसाठी नवीन नियमांची यादी तयार केलीये. T-20 वर्ल्डकप 2024 साठी ICC खूप कडक असल्याचं दिसून येतंय. कोणते नियम बदलले आहेत हे पाहूयात. 

स्टॉप क्लॉक नियम

यामधीस पहिला नियम आहे तो म्हणजे स्टॉप क्लॉक नियम. या नियमानुसार, गोलंदाजी करणाऱ्या टीमला एक ओव्हर पूर्ण झाल्यानंतर 1 मिनिटाच्या आत पुढची ओव्हर टाकणं भाग असतं. तसं न झाल्यास 5 रन्सच्या दंडाची तरतूद आहे. म्हणजेच नियम मोडल्यास फलंदाजी करणाऱ्या टीमचा स्कोर 5 रन्सने वाढेल. मात्र, अंपायर यासाठी फिल्डींग करणाऱ्या टीमला दोनदा वॉर्निंग देणार आहेत. तिसऱ्यांदा नियम मोडल्यास कारवाई केली जाणार आहे. हा नियम क्रिकेटच्या मैदानावर पहिल्यांदाच पाहायला मिळणार आहे.

3 तास 10 मिनिटांत सामना संपवा

वर्ल्डकपच्या सामन्यांच्या वेळेबाबत आयसीसीने यंदाच्या वेळी खूप कठोर असल्याचं दिसून येतंय. संपूर्ण सामना संपवण्यासाठी आयसीसीने 3 तास 10 मिनिटांची मुदत दिली आहे. तसं झालं नाही तर गोलंदाजी टीमला त्याचा भुर्दंड भराव लागणार आहे. वेळेचे उल्लंघन झाल्यास कर्णधाराला एका फील्डरला सर्कलमध्ये बोलावावे लागेल. आयसीसीने एक डाव संपण्यासाठी 1 तास 25 मिनिटांचा वेळ दिला आहे. डावाच्या ब्रेक दरम्यान इंटरवल असून 10 मिनिटं नसून 20 मिनिटं देण्यात आली आहेत.

रिझर्व डेच्या नियमांमध्ये बदल

आयसीसीनेही रिझर्व डेच्या नियमामध्येही बदल केल्याचं दिसून येतंय. यामध्ये T-20 वर्ल्डकप 2024 मध्ये ही पहिलीच वेळ आहे की दुसऱ्या उपांत्य फेरीसाठी कोणताही रिझर्व डे ठेवण्यात आलेला नाही. पहिल्या उपांत्य आणि अंतिम सामन्यासाठी रिझर्व डे ठेवण्यात आला आहे. पण दुसऱ्या उपांत्य फेरीत पावसामुळे सामन्यात व्यत्यय आल्यास नियमित वेळेपेक्षा 4 तास 10 मिनिटे अतिरिक्त दिली जाणार आहेत.

सुपर ओव्हर

साधारणपणे सामना टाय झाला की, सुपर ओव्हर खेळवली जाते. पण सुपर ओव्हर टाय झाल्यास चौकार मोजण्याचा नियम होता. 2019 च्या वर्ल्डकपवेळी हा नियम वादग्रस्त ठरला होता. त्यानंतर हा नियम हटवण्यात आला. आता निकाल जाहीर होईपर्यंत सुपर ओव्हर वर्ल्डकपमध्ये पाहायला मिळणार आहे.

पावसाच्या व्यत्ययामध्ये DLS चा होणार वापर

पावसामुळे टी-20 वर्ल्डकपच्या सामन्यामध्ये व्यत्यय आल्यास सामन्याचा निकाल डकवर्थ लुईस नियमानुसार दिला जाणार आहे. मात्र लीग राऊंड आणि लॉकआऊट सामन्यांसाठी वेगवेगळ्या अटी ठेवण्यात आल्या आहेत. साखळी फेरीच्या सामन्यांमध्ये, किमान 5 ओव्हर संपल्यानंतरच हा नियम वापरला जाईल. त्याचबरोबर नॉकआऊट 10 ओव्हर्सची मर्यादा ठेवण्यात आली आहे.