Gautam Gambhir पत्नीसोबत लुटत आहेत सुट्ट्यांचा आनंद; लेक सिटीतील सुंदर फोटो केले शेअर

'सिटी ऑफ लेक'मध्ये गौतम गंभीर लुटतोय आनंद   

Updated: Mar 8, 2021, 09:08 PM IST
Gautam Gambhir पत्नीसोबत  लुटत आहेत सुट्ट्यांचा आनंद;  लेक सिटीतील सुंदर फोटो केले शेअर

उदयपूर : भारतीय क्रिकेट संघाचा खेळाडू आणि भाजप खासदार गौतम गंभीर सध्या त्यांच्या पत्नीसह उदयपूरमध्ये सुट्ट्यांचा आनंद लुटत आहे. गौतम गंभीर आणि त्यांची पत्नी नताशा लेक ऑफ द सिटीमध्ये वेळ व्यतीत करत आहेत. गौतम यांनी पत्नीसोबत काही फोटो शेअर केले आहेत. गौतम गंभीर यांनी शेअर केलेल्या फोटोवर भारतीय क्रिकेट संघाचे माजी गोलंदाज मुनाफ पटेल यांनी कमेंट देखील केलं. 'उदयपूरमध्ये मज्जा करा...' असं कमेंट त्यांनी केलं आहे. 

गौतम गंभीर यांच्या या पोस्टला दोन तासांत 70 हजारपेक्षा जास्त नेटकऱ्यांनी लाईक केलं आहे.  त्यांची ही पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. उदयपूर बद्दल सांगायचं झालं तर या शहराची ओळख  'सिटी ऑफ लेक' अशी देखील आहे. 

उदयपूर राजस्थानमधील लोकप्रिय पर्यटक स्थळ आहे.  उदयपूरमध्ये अनेक सुंदर तलाव देखील आहेत. शिवाय उदयपूरला जगातील सर्वात सुंदर शहराचा  दर्जा देण्यात आला आहे. एवढचं नाही तर जगातील अनेक पर्यटक  उदयपूरमधील सौंदर्य पाहाण्यासाठी येत असतात.