Yuzvendra Chahalने सुंदर पत्निसाठी लिहिली रोमांटिक पोस्ट

चहल सोशल मीडियावर कायम ऍक्टिव्ह असतो.   

Updated: Mar 8, 2021, 08:02 PM IST
Yuzvendra Chahalने सुंदर पत्निसाठी लिहिली  रोमांटिक पोस्ट

मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा स्पिनर युजवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) सोशल मीडियावर कायम ऍक्टिव्ह असतो. आता चहलने महिला दिनाचं औचित्य साधत पत्नी धनश्री वर्मासाठी तिने सुंदर फोटो शेअर करत रोमांटिक पोस्ट देखील लिहिली आहे. चहलने पत्नीसाठी लिहिलेली पोस्ट सध्या सोशल मीडियावर तुफान  व्हायरल होत आहे. माझ्या जीवनातल्या प्रत्येक दिवसासाठी मी आभारी आहे, असं लिहित त्याने त्याच्या पत्नीला महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 

धनश्रीचे नवरीच्या रूपातील फोटो पोस्ट करत तो म्हणाला, 'माझ्या जीवनातल्या प्रत्येक दिवसासाठी मी आभारी आहे, देवाने तयार केलेली तू सुंदर रचना आहेस. मला कायम प्रोत्साहित आणि प्रेरणा देण्यासाठी धन्यवाद... महिला दिनाच्या शुभेच्छा..' अशी पोस्ट त्याने त्याच्या पत्नीसाठी लिहिली आहे. 

महिला दिनाचे  औचित्य साधत चहलने त्याच्या पत्नीला दिलेल्या शुभेच्छा सर्वांनाच आवडल्या आहे. अनेकांनी त्याच्या पोस्टवर कमेंट देखील दिल्या आहेत. सांगायचं झालं तर चहल आणि धनश्री सध्या मालदीवमध्ये सुट्ट्यांचा आनंद लुटत आहेत.