IPL 2021: 13 मॅचमध्ये एकही सिक्स मारला नाही; परंतु आता 2 मॅचमध्ये सिक्सेसचा वर्षाव करणारा हा विध्‍वंसक खेळाडू कोण?

जर तुम्ही आयपीएल 2020 मधील सर्वात मोठा फ्लॉप खेळाडू कोण होता? असा प्रश्न केला असता तुम्हाला एकच उत्तरं मिळेत.

Updated: Apr 15, 2021, 10:20 PM IST
IPL 2021: 13 मॅचमध्ये एकही सिक्स मारला नाही; परंतु आता 2 मॅचमध्ये सिक्सेसचा वर्षाव करणारा हा विध्‍वंसक खेळाडू कोण? title=

चेन्नई : कोरोना व्हायरसमुळे गेल्या वर्षाचा इंडियन प्रीमियर लीगचा (IPL) 13 वा सीजन संयुक्त अरबमधील अमीरातमध्ये खेळला गेला होता. जर तुम्ही आयपीएल 2020 मधील सर्वात मोठा फ्लॉप खेळाडू कोण होता? असा प्रश्न केला असता तुम्हाला एकच उत्तरं मिळेत. आयपीएल 2020 चा सर्वात मोठा फ्लॉप खेळाडू होता ग्लेन मॅक्सवेल (Glenn Maxwell).

विस्फोटक बॅट्समॅन मॅक्सवेल गेल्या वर्षीच्या सीझनमध्ये पंजाब किंग्सच्या टीममधूम खेळला होता. त्या सीझनमध्ये त्याच्या बॅटीला गंज लागला होता. आयपीएलचा 13 वा सीजन संपेपर्यंत मॅक्सवेल काही चालला नाही. मात्र या सीझनमध्ये मॅक्सवेल कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बँगलोर संघाचा भाग आहे आणि आता त्याच्या बॅटीमधून रनांचा वर्षाव होत आहे.

सनराइजर्स हैदराबादविरुद्धच्या मॅचमध्ये चांगली गोष्ट होता ती म्हणजे, मॅक्सवेलचे 3 छक्के. मॅक्सवेलचे हे छक्के यासाठी महत्वाचे होते कारण, गेल्या वर्षीच्या सीजनमध्ये पंजाब किंग्समध्ये खेळत असताना त्याने एकही छक्का मारला नव्हता. आयपीएल 2020 मध्ये मॅक्सवेलने 13 मॅचमध्ये 15.42 च्या सरासरी आणि 101.88 च्या स्‍ट्राइक रेटमधून 106 बॉल्सवर फक्त 108 धावा केल्या आहेत. यावेळी त्याचा सर्वात जास्त स्कोर 32 रनांचा झाला.

मॅक्सवेलने दोन सामन्यात 8 चौके आणि 5 छक्के मारले आहेत. म्हणजेच जे काम मॅक्सवेल 13 सामन्यात करू शकला नाही, त्याने ते दोन सामन्यांमध्ये केले आहे. मॅक्सवेलने हैदराबादविरुद्ध 41 बॅालमध्ये 5 चौके आणि 3 छक्क्याच्या मदतीने 59 धावा केल्या, तर मुंबई इंडियन्सविरुद्धच्या पहिल्या सामन्यात त्याने 28 बॅालमध्ये 3 चौके आणि 2 छक्के मारून 39 धावा केल्या.