व्हिडिओ: सपनाने फिरवला धोनीच्या गळ्यावर वस्तारा

व्हिडिओत स्पष्ट दिसते आहे की, सपना भलतीच उत्साहीत झाली आहे. पण, धोनी मात्र नेहमीप्रमाणेच अगदी कूल दिसत आहे.

Updated: Jul 29, 2018, 12:03 PM IST
व्हिडिओ: सपनाने फिरवला धोनीच्या गळ्यावर वस्तारा title=

मुंबई: सेलिब्रेटी हेअर स्टायलिस्ट सपना भवनानी ही सोशल मीडियावर जोरदार अॅक्टीव्ह असते. अनेकदा ती भारतीय क्रिकेटपटू आणि माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचे फोटोही शेअर करत असते. सपनाने धोनीची हेअरस्टाईलही अनेकदा हटके केली आहे. सपनाने याही वेळी तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक मजेशीर व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ सध्या भलताच व्हायरल होत आहे.

नव्या कोऱ्या वस्ताऱ्याने धोनीची दाढी

सपनाने इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये ती धोनीची दाढी करताना दिसते. मजेशीर असे की, या वेळी सपना धोनीची दाढी करण्यासाठी एखादे रेजर किंवा ट्रिमर वापरण्याऐवजी चक्क वस्ताराच वापरताना दिसत आहे. हा व्हिडिओ शेअर करताना सपनाने लिहिले आहे की, ती गेली अनेक दिवस फजील नावाचा एक नाव वस्तारा वापरण्यास शिकत आहे. अखेर या वस्ताऱ्याचा वापर करण्याची संधी धोनीमुळे मिळाली. सपनाने ही घटना गुरूपौर्णिमेशी जोडली असून, आपल्यासाठी ही गुरूपौर्णिमा शानदार राहिली असल्याचे म्हटले आहे. 

पहिल्यांदाच चालवला वस्तारा

दरम्यान, काहीशा लडीवाळ स्वरात केलेल्या तक्रारीत सपनाने म्हटले आहे की, भलेही धोनी तिच्यासोबतचा एकही फोटो शेअर करत नाही. पण, तो नेहमीच माझ्यासोबत फोटो काढतो आणि मला त्याच्यावर वेगवेगळे प्रयोग करण्याची संधीही देतो. धोनीचे कौतुक करत सपना लिहिते की, आज धोनीने पहिल्यांदा मला वस्तारा चालवायला दिला.

धोनीच्या लांब केसांना सपनाची कात्री

व्हिडिओत स्पष्ट दिसते आहे की, सपना भलतीच उत्साहीत झाली आहे. पण, धोनी मात्र नेहमीप्रमाणेच अगदी कूल दिसत आहे. हा व्हिडिओ आतापर्यंत ७० हजारांहून अधिक लोकांनी पाहिला आहे. सपनाने हा व्हिडिओ फेसबुक पेजवरही शेअर केला आहे. तुम्हाला माहिती आहे का, आपल्या लांब केसांची स्टाईल घेऊन आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलेल्या धोनीच्या लांब केसांनाही सपनानेच पहिल्यांदा कात्री लावली होती.