हरभजन सिंग होणार पुन्हा एकदा बाबा

पत्नी गीता बसरा हीने दिली माहिती

Updated: Mar 15, 2021, 12:20 PM IST
हरभजन सिंग होणार पुन्हा एकदा बाबा

मुंबई : भारतीय क्रिकेटपटू हरभजन सिंग  (Harbhajan Singh) पुन्हा बाबा होणार आहे. त्यांची पत्नी गीता बसरा (Geeta Basra) यांनी ही माहिती दिली आहे. आयपीएल 2021 नंतर भज्जीच्या घरी पुन्हा एकदा पाळणार हलणार आहे. यावर्षी कोलकाता नाईट रायडर्सच्या वतीने हरभजन सिंग भारताच्या मेगा टी -20 लीगमध्ये भाग घेणार आहे.

जुलैमध्ये होणार बाबा

हरभजन सिंगची (Harbhajan Singh) पत्नी गीता बसरा (Geeta Basra)  यांनी ट्विटरवर भज्जी आणि त्यांची 4 वर्षांची मुलगी हिनाया हीर प्लाहासोबत फोटो शेअर केले आहेत. बसरा यांनी लिहिले, 'लवकरच. जुलै 2021.'

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Geeta Basra (@geetabasra)

मोठी बहिण होणार हिनाया

फोटोमध्ये मुलगी हिनाया हीर प्लाहा (Hinaya Heer Plaha) टी-शर्ट घेताना दिसली आहे, 'लवकरच मी मोठी बहीण होणार आहे' असे त्यावर लिहिलेले आहे.

चाहत्यांनी दिल्या शुभेच्छा

चाहत्यांनी सोशल मीडियावर हरभजन सिंग (Harbhajan Singh) आणि गीता बसरा (Geeta Basra)  यांचे अभिनंदन करत आहेत.

२०१५ मध्ये झाले लग्न

क्रिकेटर हरभजन सिंग (Harbhajan Singh) आणि अभिनेत्री गीता बसरा (Geeta Basra)  यांनी 29 ऑक्टोबर 2015 रोजी लग्न केले.

२०१६ मध्ये पहिल्यांदा झाला बाबा

हरभजन सिंगची (Harbhajan Singh) पत्नी गीता बसरा (Geeta Basra) हिने 27 जुलै 2016 रोजी पहिल्या बाळाला हिनाया हीर प्लाहाला (Hinaya Heer Plaha) जन्म दिला.