हरभजन सिंगची २०१९ वर्ल्ड कपसाठीची भारतीय टीम

भारताचा ऑफ स्पिनर हरभजन सिंगनं २०१९ सालच्या वर्ल्ड कपची त्याच्या पसंतीची भारतीय टीमची निवड केली आहे.

Updated: Feb 14, 2019, 01:37 PM IST
हरभजन सिंगची २०१९ वर्ल्ड कपसाठीची भारतीय टीम title=

मुंबई : भारताचा ऑफ स्पिनर हरभजन सिंगनं २०१९ सालच्या वर्ल्ड कपची त्याच्या पसंतीची भारतीय टीमची निवड केली आहे. २०१९ च्या या वर्ल्ड कपला ३० मेपासून इंग्लंडमध्ये सुरुवात होईल, तर १४ जुलैला वर्ल्ड कपची फायनल खेळवली जाईल. या वर्ल्ड कपमध्ये १० टीम सहभागी होणार आहेत. हरभजनच्या या टीममध्ये फारसे आश्चर्यकारक बदल नसले, तरी त्यानं ऋषभ पंतला त्याच्या १५ जणांच्या टीममध्ये निवडलेलं नाही.

यंदाच्या रणजी मोसमात चांगली कामगिरी केलेल्या विदर्भाचा फास्ट बॉलर उमेश यादवला संधी देण्यात यावी, असं हरभजनला वाटतंय. याचबरोबर ऑलराऊंडर विजय शंकरलाही वर्ल्ड कपला पाठवण्याची हरभजनची अपेक्षा आहे. तिसरा ऑलराऊंडर म्हणून हरभजननं जडेजाच्या नावाला पसंती दिली आहे.

'२०१७ साली झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीदरम्यान इंग्लंडमधलं वातावरण गरम आणि दमट होतं. यावेळीही अशीच परिस्थिती राहिली आणि प्रतिस्पर्धी टीममध्ये पाच-सहा उजव्या हातानं बॅटिंग करणारे बॅट्समन असले, तर जडेजाचा चांगला वापर होऊ शकतो. तरसंच जडेजाला सहाव्या आणि हार्दिक पांड्याला सातव्या क्रमांकावर खेळवलं जाऊ शकतं,' असं मत हरभजननं व्यक्त केलं.

भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये होणाऱ्या टी-२० आणि वनडे सीरिजसाठी युवा खेळाडूंना संधी दिली जाऊ शकते, असं हरभजनला वाटतंय. 'या सीरिजसाठी तुमचे सर्वोत्तम ११-१३ खेळाडू खेळवण्याची गरज नाही. भारतीय टीम नुकतीच ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडचा मोठा दौरा आटपून आली आहे. यानंतर आयपीएललाही सुरुवात होईल, त्यामुळे खेळाडूंच्या शरिरावर ताण येईल. काही वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देणं योग्य होईल', असं हरभजन इंडिया टुडेशी बोलताना म्हणाला.

'वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देऊन पृथ्वी शॉ, मयंक अग्रवाल, प्रियंक पांचाळ, सिद्धार्थ कौल आणि मयंक मार्कंडे यांचा ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सीरिजमध्ये समावेश केला जाऊ शकतो', अशी प्रतिक्रिया हरभजननं दिली.

हरभजनचा वर्ल्ड कपसाठीची भारतीय टीम

रोहित शर्मा, शिखर धवन, विराट कोहली, अंबाती रायुडू, एमएस धोनी, केदार जाधव, हार्दिक पांड्या, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, युझवेंद्र चहल, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, दिनेश कार्तिक, उमेश यादव, विजय शंकर, रवींद्र जडेजा(शक्यता)

जहीर खानची २०१९ वर्ल्ड कपसाठीची भारतीय टीम

गौतम गंभीरची २०१९ वर्ल्ड कपसाठीची भारतीय टीम