'मला माझीच लाज वाटते...', थप्पड प्रकरणावर हरभजन झाला भावूक, Virat Kohli ला विनंती करत म्हणाला...

Virat Kohli Gautam Gambhir fight: टीम इंडियाचा माजी फिरकीपटू हरभजन सिंह (Harbhajan Singh) याने श्रीसंतच्या (Sreesanth) थप्पड प्रकरणाचं स्वत:चं उदाहरण देत विराट आणि गंभीरला सबुरीचा सल्ला दिला आहे.

सौरभ तळेकर | Updated: May 3, 2023, 04:06 PM IST
'मला माझीच लाज वाटते...', थप्पड प्रकरणावर हरभजन झाला भावूक, Virat Kohli ला विनंती करत म्हणाला... title=
harbhajan Singh,Sreesanth

Harbhajan Singh On Sreesanth: यंदाच्या आयपीएल 2013 च्या हंगामातील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि लखनऊ सुपर जायन्टस (RCB vs LSG) या दोन संघातील सामना खऱ्या अर्थाने चर्चेत राहिला तो विराट कोहली (Virat Kohli) आणि गौतम गंभीरच्या (Gautam Gambhir) भांडणामुळे. 10 वर्षानंतर पुन्हा एक विराट आणि गंभीर (Virat Gambhir fight) भिडल्याचं दिसून आलं. त्यामुळे आता क्रिडाविश्वातून दोन्ही दिग्ग्जांवर टीका होताना दिसत आहे. या प्रकरणावर अनेक प्रतिक्रिया उमटताना दिसत आहे. अशातच आता टीम इंडियाचा माजी फिरकीपटू हरभजन सिंह (Harbhajan Singh) याने स्वत:चं उदाहरण देत विराट आणि गंभीरला सबुरीचा सल्ला दिला आहे.

मुंबई इंडियन्स आणि किंग्स इलेव्हन (MI vs KXIP 2013) पंजाब यांच्यात 2013 साली झालेल्या सामन्यात रागाच्या भरात हरभजनने सेलिब्रेशन करत असलेल्या श्रीसंतच्या (S. Sreesanth) कानाखाली मारली होती. या थप्पड प्रकरणानंतर मोठा वाद देखील झाला होता. त्यावर आता भज्जीने मोठं वक्तव्य केलं आहे.

काय म्हणाला Harbhajan Singh?

विराट आणि गंभीरमधील हा लढा इथंच संपणार नाही, कारण त्यावर क्रिडाविश्वात आणि इतर ठिकाणी बरंच काही बोललं जाईल. कोण काय आणि का बोलले? सर्व काही वेळेत उघड होईल. एक खेळाडू म्हणून मी ही परिस्थिती जगलो आहे, 2008 मध्ये श्रीसंत आणि माझ्यात असंच काहीसं घडलं होतं, असं हरभजन सिंह याने म्हटलं होतं. त्याचबरोबर त्याने ट्विट करत भावना प्रकट केल्या आहेत.

हरभजन सिंहचं ट्विट

2008 मध्ये मी श्रीसंतसोबत जे काही केलं, त्याची मला लाज वाटते. विराट कोहली एक दिग्गज खेळाडू आहे, अशा गोष्टींमध्ये अडकू नये. विराट आणि गंभीर यांच्यात जे काही घडलं ते क्रिकेटसाठी योग्य नव्हतं, असं हरभजन सिंह (Harbhajan Singh) याने ट्विट करत म्हटलं आहे.

आणखी वाचा - Virat Kohli Car: "मी भावासोबत पेट्रोल पंपावर पोहोचलो अन्..."; विराटने सांगितला पहिल्या गाडीचा किस्सा!

पाहा ट्विट - 

दरम्यान, मला वाटायचं मी नेहमीच बरोबर आहे, पण मी चूक होतो आणि मी जे केले ते खूप चुकीचं होतं, असं म्हणताना हरभजन भावूक झाल्याचं दिसून आलं. जेव्हा मी श्रीसंतसोबतच्या घटनेकडे मागे वळून पाहतो तेव्हा मला नेहमी वाटतं की मी असं करायला नको होतं, असं म्हणत हरभजनने (Harbhajan Singh On Thappad) भावनांना वाट मोकळी करून दिली आहे.