'हीच माझी फटाकडी'; हार्दिक पांड्याकडून प्रेमाची कबुली

भारताचा क्रिकेटपटू हार्दिक पांड्याने त्याच्या प्रेमाची कबुली दिली आहे. 

Updated: Jan 1, 2020, 03:59 PM IST
'हीच माझी फटाकडी'; हार्दिक पांड्याकडून प्रेमाची कबुली title=

मुंबई : भारताचा क्रिकेटपटू हार्दिक पांड्याने त्याच्या प्रेमाची कबुली दिली आहे. हार्दिक पांड्याने सर्बियन अभिनेत्री आणि मॉडेल नताशा स्टेनकोविक सोबतचा एक फोटो शेयर केला आहे. 'माझ्या फटाकडीसोबत नव्या वर्षाची सुरुवात', असं कॅप्शन हार्दिक पांड्याने या फोटोला दिलं आहे. इन्स्टाग्रामवर शेयर केलेल्या या फोटोमध्ये हार्दिक पांड्याने नताशाचा हात धरला आहे. पांड्याने या फोटोसोबत हृदयाचं इमोजी टाकलं आहे.

अनेक दिवसांपासून हार्दिक आणि नताशा एकमेकांना डेट करत आहेत. नताशा हार्दिकसोबत अनेक पार्ट्यांमध्ये आणि त्याच्या घरीही पाहायला मिळाली आहे. त्यामुळे या दोघांच्या रिलेशनशीपबाबत अनेकवेळा चर्चाही झाल्या आहेत. आता अखेर हार्दिक पांड्याने या चर्चांना पूर्णविराम लावला आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Starting the year with my firework

A post shared by Hardik Pandya (@hardikpandya93) on

हार्दिक पांड्या आणि नताशाच्या या फोटोवर युझवेंद्र चहल, सिद्धेश लाड, हार्दिक पांड्याची वहिनी आणि कृणाल पांड्याची पत्नी पंखुडी शर्मा, अर्जुन कपूर, सोफी चौधरी, क्रिस्टल डिसूजा यासारख्या सेलिब्रिटींनी कमेंट केली आहे. हार्दिक पांड्याच्या वाढदिवशी त्याच्यासाठी प्रेमाचा संदेश पाठवल्यामुळेही नताशा चर्चेत आली होती.