close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

पंड्या बंधू चालवतायत तब्बल एवढ्या रुपयांची गाडी

क्रिकेटपटू हार्दिक पंड्या आणि त्याचा भाऊ कृणाल पंड्या मुंबईच्या रस्त्यांवर लॅम्बोर्गिनी ही अलिशान गाडी चालवताना दिसले.

Updated: Aug 18, 2019, 10:22 PM IST
पंड्या बंधू चालवतायत तब्बल एवढ्या रुपयांची गाडी

मुंबई : क्रिकेटपटू हार्दिक पंड्या आणि त्याचा भाऊ कृणाल पंड्या मुंबईच्या रस्त्यांवर लॅम्बोर्गिनी ही अलिशान गाडी चालवताना दिसले. तब्बल तीन कोटी, ७३ लाखांच्या या गाडीतून बांद्राच्या रस्त्यांवर हार्दिक ही अलिशान गाडी चालवत होता. तर त्याचा भाऊ कृणाल पंड्या शेजारी बसला होता. काही महिन्यांपूर्वीच हार्दिकनं दोन कोटी, १९ लाखांची मर्सिडीज गाडीदेखील खरेदी केली होती.

भगव्या रंगाच्या लॅम्बोर्गिनीतून हार्दिक आणि कृणाल फिरतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पण ही गाडी पंड्या बंधूंपैकी कोणी खरेदी केली आहे का? याबाबत माहिती उपलब्ध झालेली नाही. हार्दिक किंवा कृणाल यांच्यापैकी कोणीही या गाडीचे फोटो सोशल नेटवर्किंगवर शेअर केले नाहीत. लॅम्बोर्गिनी हुराकन इव्हीओ ही गाडी या वर्षाच्या सुरुवातीला भारतात लॉन्च करण्यात आली. ही गाडी सध्या एकाच रंगामध्ये उपलब्ध आहे.