Team India : टीम इंडियाने (Team India) बॉर्डर-गावस्कर (Border–Gavaskar Trophy) ट्रॉफीचा दुसरा सामना जिंकून सिरीजमध्ये 2-0 अशी आघाडी घेतली आहे. दुसऱ्या टेस्ट सामन्यामध्ये 6 विकेट्सने पराभव केला. दिल्लीच्या अरूण जेटली स्टेडियमवर रंगलेला दुसरा टेस्ट सामन्याचा निर्णय तिसऱ्याच दिवशी लागला. नागपूर टेस्ट सामन्यामध्येही कांगारूंवर अशीच काहीशी परिस्थिती ओढावली होती. दरम्यान या सामन्यात डग आऊटमध्ये एक व्यक्ती घुसला असल्याची घटना घडली.
ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या दुसऱ्या टेस्ट सामन्यामध्ये हार्दिक पंड्या (Hardik Pandya) सारखा दिसणारा एक व्यक्ती अचानक ड्रेसिंग रूममध्ये दिसून आला. काहीवेळानंतर या व्यक्तीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल देखील झाले होते. व्हायरल झालेल्या या फोटोंनुसार, सूर्यकुमार यादवसोबत बसलेला हा व्यक्ती हुबेहुब पंड्यासारखा दिसतोय.
या सामन्यादरम्यान, टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये अचानक हार्दिक पांड्यासारखा दिसणाऱ्या एका व्यक्तीला स्पॉट करण्यात आला. या व्यक्तीला पाहून सर्वजण त्याला हार्दिक समजू लागले. दरम्यान व्हायरल फोटोमध्ये दिसणारी व्यक्ती दुसरी कोणी नसून टीम इंडियाचे फिल्डींग कोच प्रशिक्षक टी दिलीप आहेत.
Hardik Pandya and Suryakumar Yadav's reaction when Ravi Ashwin gets Matt Renshaw and their review was lost. pic.twitter.com/GYtv48mBKL
— CricketMAN2 (@ImTanujSingh) February 19, 2023
भारत आणि ऑस्ट्रेलिया (ind vs aus 2nd test) यांच्यातील कसोटी मालिकेतील दुसरा सामना दिल्लीत खेळवला गेला. ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून पहिल्या डावात 263 धावा केल्या. उस्मान ख्वाजा आणि पीटर हँड्सकॉम्ब यांनी हाफ सेंच्युरी झळकावली. तर टीम इंडियाच्या वतीने शमीने चार आणि अश्विन-जडेजाने प्रत्येकी तीन बळी घेतले.
ऑस्ट्रेलियाने दिलेल्या 264 धावांचा पाठलाग करताना भारताचा डाव 262 वर आटोपला गेला. विराट कोहलीने 44 धावा केल्या तर अक्षर पटेलने 74 धावा करत भारताला सावरलं. पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाने 1 रनची लीड घेतली. त्यानंतर दुसऱ्या डावात रविंद्र जडेजा आणि आश्विने सटीक मारा करत 10 विकेट काढल्या. त्यात जडेजाच्या 7 तर आश्विनच्या 3 होत्या.