Hardik Pandya Divorce: घटस्फोटानंतर हार्दिक पांड्याची 70 टक्के संपत्ती नताशाच्या वाट्याला? चर्चांना उधाण, Photo Viral

Hardik Pandya Natasa Stankovic Divorce: हार्दिक पांड्या, नताशाच्या नात्यात खरंच दुरावा आलाय? पोटगीच्या रकमेवरून सोशल मीडियावर नव्या चर्चांना उधाण  

सायली पाटील | Updated: May 25, 2024, 11:47 AM IST
Hardik Pandya Divorce: घटस्फोटानंतर हार्दिक पांड्याची 70 टक्के संपत्ती नताशाच्या वाट्याला? चर्चांना उधाण, Photo Viral  title=
Hardik Pandya Natasa Stankovic Divorce later will get 70 percent of property as per reports

Hardik Pandya Natasa Stankovic Divorce: भारतीय क्रिकेट संघातील युवा खेळाडू आणि फार कमी वेळात प्रकाशझोतात आलेल्या हार्दिक पांड्यानं गेल्या काही दिवसांमध्ये आव्हानात्मक परिस्थितीचा सामना केल्याचं पाहायला मिळालं. IPl 2024 मध्ये हार्दिकच्या नेतृत्त्वाखाली मैदाना आलेल्या मुंबई इंडियन्सच्या संघाला अपेक्षित यश मिळालं नाही आणि इथंच क्रिकेटप्रेमींनी या खेळाडूवर तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. एकिकडे करिअरमध्ये या आव्हानांचा सामना करत असतानाच आता चर्चा अशीही आहे की, हार्दिकच्या खासगी जीवनातही काही समीकरणं बिनसली आहेत. 

काही माध्यमांनी प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार आणि सोशल मीडियावर सुरु असणाऱ्या चर्चांनुसार हार्दिक पांड्या आणि त्याची पत्नी, नताशा स्टॅनकोविक त्यांच्या वैवाहिक नात्याला पूर्णविराम देत आहेत. हार्दिक आणि नताशाच्या नात्यासंदर्भातील कोणतीही अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही, किंवा या दोघांपैकी कोणीही यावर कोणतीही प्रतिक्रियासुद्धा दिलेली नाही. हार्दिकच्या एकूण संपत्तीतून इतकी मोठी रक्कम नताशाकडे जाणार असल्याच्या या चर्चेमुळं अनेकांच्या भुवया मात्र उंचावल्या तर त्यातून आणखीही काही चर्चांना वाव मिळाला. पण, यासंदर्भातील कोणताही दावा किंवा अधिकृत माहिती मात्र समोर आलेली नाही. 

इतकंच नव्हे, तर पोटगीच्या स्वरुपात नताशाला हार्दिकच्या एकूण संपत्तीपैकी 70 टक्के भाग मिळणार असल्याची माहितीसुद्धा काही सूत्रांमार्फत मिळाल्यामुळं या चर्चांचं वारं चौफेर उधळ्याचं पाहायला मिळत आहे. 

Hardik Pandya Divorce

इथं हार्दिक आणि नताशाच्या नात्यामध्ये गोष्टी बिनसल्याच्याच चर्चांनी जोर धरलेला असताना अनेकांनीच सोशल मीडियावर नताशाच्या अकाऊंटचा आढावलाही घेतल्याचं पाहायला मिळालं. जिथं तिनं शेअर केलेले इन्स्टा स्टेटस पाहून नेटकरी थक्कच झाले. कुठं नताशा फेस थेरपी घेताना दिसली, तर कुठं मुलासोबतच बाहेर जाताना, एका स्टोरीमध्ये तिनं स्वत:च्या फिटनेसवरही भर दिल्याचं पाहायला मिळालं. थोडक्यात इथं नताशाच्या स्टोरी आणि तिथं तिच्या आणि हार्दिकच्या नात्यात आलेल्या दुराव्यासंबंधीच्या चर्चा पाहता नेटकरीही गोंधळून गेले आहेत. ज्यामुळं नवनवीन चर्चा सातत्यानं डोकं वर काढत आहेत. 

Hardik Pandya

हेसुद्धा वाचा : विमान प्रवासातील टर्ब्युलन्स म्हणजे नेमकं काय? अशा वेळी प्रवाशांनी काय करावं? 

गेल्या कैक दिवसांपासून एकत्र नाहीत हार्दिक- नताशा 

सूत्रांच्या माहितीनुसार हार्दिक आणि नताशा मागील काही दिवसांपासून एकत्र नाहीयेत. त्यांची अखेरची एकत्र पोस्टही 14 फेब्रुवारी रोजी करण्यात आली होती. यानंतर एका कार्यक्रमात दोघं एकत्र दिसले खरे, पण आता मात्र त्यांच्या नात्यात दुरावा आला असून, चर्चेत असणाऱ्या मुद्द्यानुसार घटस्फोटानंतर पोटगीच्या स्वरुपात हार्दिक नताशाला संपत्तीच्या 70 टक्के रक्कम देऊ शकतो. अद्याप या वृत्ताला दुजोरा देणाही माहिती मात्र समोर आलेली नाही.

हार्दीकची एकूण संपत्ती किती? 

'स्पोर्ट्स कीडा'च्या वृत्तांनुसार हार्दिक पांड्याच्या एकूण संपत्तीचा आकडा 91 कोटी रुपये इतका आहे. हार्दिक आयपीएलव्यतिरिक्त भारतीय संघातून खेळतानाही दमदार कमाई करतो. अनेक ब्रँडच्या जाहिरातींच्या निमित्तानंसुद्धा तो बक्कळ पैसा कमवतो. मीडिया रिपोर्टनुसार हार्दिककडे वडोदरा इथं एक पेंटहाऊस असून, मुंबईतही त्याचं स्वत:चं घर आहे. या घराती किंमत 30 कोटी रुपये सांगितली जाते.