हार्दिक-विराटच्या मैत्रीत फूट? विकेट घेतल्यानंतर कोहलीला केलं इग्नोर; VIDEO व्हायरल

विकेट घेतल्यानंतर हार्दिक पंड्याने टीमच्या इतर खेळाडूंसोबत विकेट सेलिब्रेट केली. मात्र टीमचा स्टार खेळाडू विराट कोहली (Virat Kohli) ला इन्गोर केलं.

Updated: Jan 24, 2023, 08:21 PM IST
हार्दिक-विराटच्या मैत्रीत फूट? विकेट घेतल्यानंतर कोहलीला केलं इग्नोर; VIDEO व्हायरल

Hardik Pandya Openly Ignoring Kohli : भारतीय टीमचा ऑलराऊंडर हार्दिक पांड्या (Hardik Pandya) ने न्यूझीलंडविरूद्धच्या तिसऱ्या सामन्यात उत्तम फलंदाजी केली. या सामन्यामध्ये त्याने चांगल्या फिनीशरची भूमिका साकारली. 38 बॉल्समध्ये हार्दिकने तुफान खेळी तर 54 रन्स केले. यामध्ये 3 फोर आणि 3 सिक्सचा समावेश होता. केवळ फलंदाजीच नाही तर गोलंदाजीमध्येही त्याने चांगली कामगिरी केली. मात्र यावेळी त्याने टीमचा माजी कर्णधार विराट कोहलीसोबत (Virat Kohli) असं कृत्य केलं की, ज्यामुळे पुन्हा एकदा पंड्या चर्चेत आला आहे.

Hardik Pandya विराटला केलं इग्नोर 

इंदूरमध्ये खेळवल्या जाणाऱ्या सामन्यात हार्दिक पंड्याने (Hardik Pandya) गोलंदाजी आणि फलंदाजी या दोन्हीमध्ये चांगली कामगिरी केली. तिसऱ्या सामन्यात रोहितने (Rohit sharma) सिराज आणि शमीच्या अनुपस्थितीत हार्दिककडून पहिली ओव्हर खेळवली. ज्यामध्ये त्याने न्यूझीलंडच्या ओपनर फलंदाजाला माघारी धाडलं.

विकेट घेतल्यानंतर हार्दिक पंड्याने टीमच्या इतर खेळाडूंसोबत विकेट सेलिब्रेट केली. मात्र टीमचा स्टार खेळाडू विराट कोहली (Virat Kohli) ला इन्गोर केलं. मुख्य म्हणजे, किंग कोहली विकेट घेतल्यानंतर त्याचं कौतुक करायला हार्दिक जवळ येत होता. मात्र हार्दिकने त्याच्याकडे दुर्लक्ष केलं.

व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहून शकता की, कोहली येत असताना हार्दिक टर्न मारला आणि त्याच्या बॉलिंग एंडकडे निघून जातो. दरम्यान यामुळे विराट कोहली काहीसा उदास होत असल्याचंही दिसून येतंय. मुळात हार्दिक पंड्याचं हे वागणं काही नवीन नाही. यापूर्वी देखील तो विराटसोबत असा वागल्याचं दिसून आलं होतं.

श्रीलंकेविरूद्ध हार्दिकने विराट कोहलीवर केली होती दादागिरी

श्रीलंकेविरूद्धच्या एका सामन्यात पांड्यानं विराटला धाव घेण्यापासून रोखलं आणि त्याचा हा निर्णय विराटला पटला नाही. त्यानं डोळ्यातूनच धाक देत पांड्याला आपण नाराज असल्याचं स्पष्ट केलं. यावेळी पांड्यानं काही कारणास्तव त्याच्या नजरेला नजरच दिली नाही. यानंतर सामन्यादरम्यान आणखी एका क्षणीसुद्धा त्यांच्यामध्ये असं काही घडलं की इथंही विराटचे संतप्त हावभाव सर्वांनीच पाहिले. 

इशान किशन विराटवर संतापला

तिसऱ्या वनडे सामन्यात आऊट झाल्यानंतर पव्हेलियनमध्ये परतत असताना ईशान किशन विराट कोहलीवर संतापलेला दिसला. किशान इतका संतापला होता की, पव्हेलियनमध्ये जात असताना विराट त्याला काहीतरी समजवण्याचा प्रयत्न करत होता, मात्र काहीही न ऐकता तो संतापाने निघून गेला. यावेळी त्याने एकदाही विराटकडे वळून पाहिलं नाही. इतकंच नाही तर जाताना रागाच्या भरात तो विराटला अपशब्द बोलून गेला असल्याची सोशल मीडियावर चर्चा आहे.