भारतात परतताच हार्दिक पांड्या अडचणीत, एअरपोर्टवर एवढ्या कोटींचा माल जप्त

हार्दिक पांड्याच्या लक्झरी लाईफमुळे अडचणी वाढल्या 

Updated: Nov 16, 2021, 07:32 AM IST
भारतात परतताच हार्दिक पांड्या अडचणीत, एअरपोर्टवर एवढ्या कोटींचा माल जप्त  title=

मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याने आपल्या कारकिर्दीत फार कमी वेळात यश मिळवले. हार्दिक पांड्या लक्झरी लाइफ जगण्यासाठी ओळखला जातो. हार्दिक पांड्याने फार कमी वेळात जागतिक क्रिकेटमध्ये खूप संपत्ती आणि प्रसिद्धी मिळवली आहे.

हार्दिक पांड्याबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे की, सीमा शुल्क विभागाने त्याची 5 कोटींची दोन घड्याळे जप्त केली आहेत. त्यामुळे भारतात परतताच हार्दिक पांड्याच्या अडचणीत वाढ झाली आहे. 

कस्टम विभागाने जप्त केली 5 कोटींची मालमत्ता 

भारत लौटते वक्त बुरी तरह फंसे हार्दिक पांड्या, एयरपोर्ट पर जब्त हुईं 5 करोड़ की 2 घड़ियां

हार्दिक पांड्याच्या घड्याळाची किंमत जाणून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. हार्दिक पांड्याच्या या 2 घड्याळांची किंमत 5 कोटी रुपये आहे. हार्दिकच्या या 2 घड्याळांनी इंटरनेटवर खळबळ उडवून दिली आहे. हार्दिक पांड्यासाठी हा काळ चांगला जात नाही.

टी-20 विश्वचषकानंतर सिलेक्टर्सने त्याला टीम इंडियातून वगळले. आता असे वृत्त आहे की, हार्दिक पांड्या टी-20 विश्वचषक स्पर्धेनंतर यूएईहून मुंबईला परतताना सीमाशुल्क विभागाने त्याची दोन घड्याळे जप्त केली आहेत.

का जप्त झाली हार्दिक पांड्याची कोटीची घड्याळं?

हार्दिककडे या घड्याळांचे बिल नव्हते आणि त्याने घड्याळे जाहीरही केली नाहीत. यानंतर सीमाशुल्क विभागाने मुंबई विमानतळावर हार्दिक पांड्याची ५ कोटींची दोन घड्याळे जप्त केली आहेत. हार्दिकला महागड्या घड्याळांची खूप आवड आहे.

काही महिन्यांपूर्वी, त्याने एक Patek Philippe Nautilus Platinum 5711 घड्याळ खरेदी केले आहे, ज्याची किंमत 5 कोटींहून अधिक आहे.

टी 20 वर्ल्ड कपमध्ये हार्दिक पांड्या ठरला फ्लॉप 

हार्दिक पांड्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये फ्लॉप झाला आहे. पाच मॅचच्या तीन इनिंगमध्ये फक्त 69 रन्स करू शकला आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी हार्दिक पांड्याला टीम इंडियातून वगळण्यात आले आहे. हार्दिक पंड्याच्या जागी व्यंकटेश अय्यरचा अष्टपैलू खेळाडू म्हणून संघात समावेश करण्यात आला आहे.

तुफानी बॅटिंग आणि घातक बॉलिंगकरता खेळाडू माहिर 

व्यंकटेश अय्यरने IPL 2021 च्या 10 सामन्यांमध्ये 128.47 च्या स्ट्राइक रेटने 370 धावा केल्या आहेत. ज्यामध्ये 4 अर्धशतकांचा समावेश आहे. उजव्या हाताने वेगवान गोलंदाजी करणारा अष्टपैलू व्यंकटेश अय्यरचा गोलंदाज म्हणून टी-२० मध्ये उत्कृष्ट विक्रम आहे.

व्यंकटेश अय्यरने एकूण 48 टी-20 क्रिकेट सामन्यांमध्ये 24 बळी घेतले आहेत. व्यंकटेश अय्यरने 10 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 7 आणि 24 लिस्ट ए सामन्यांमध्ये 5.50 च्या इकॉनॉमीने 10 बळी घेतले आहेत. व्यंकटेश अय्यरने आपल्या चमकदार कामगिरीने दाखवून दिले की तो हार्दिक पांड्याला सर्वोत्तम पर्याय ठरू शकतो.

17 नोव्हेंबरपासून खेळणार महत्वाची सिरीज 

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात १७ नोव्हेंबर ते २१ नोव्हेंबर दरम्यान तीन सामन्यांची टी-२० मालिका खेळवली जाणार आहे. T20 मालिका संपल्यानंतर भारतीय संघाने 25 नोव्हेंबर ते 7 डिसेंबर दरम्यान 2 सामन्यांची कसोटी मालिकाही खेळली आहे. न्यूझीलंड हाच संघ आहे, ज्याला 2003 पासून आजपर्यंत भारताला ICC टूर्नामेंटमध्ये पराभूत करता आलेले नाही. आम्ही तुम्हाला सांगतो की 2021 टी-20 विश्वचषक भारतासाठी आतापर्यंत खूप भयानक ठरला आहे.