मुंबई : आगामी दक्षिण आफ्रिका दौऱ्यात टी-२० मालिकेत भारतीय महिला संघाची अष्टपैलू खेळाडू हरमनप्रीत कौरकडे भारतीय महिला संघाचं नेतृत्व सोपवण्यात आलेलं आहे.
१३ फेब्रुवारीपासून या मालिकेला सुरुवात होणार आहे. हरमनप्रीत कौरसोबत महाराष्ट्राच्या स्मृती मानधनाकडे भारतीय संघाचं उप-कर्णधारपद सोपवण्यात आलेलं आहे.
एकदिवसीय मालिकेनंतर भारतीय महिलांचा संघ दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ५ टी-२० सामन्यांची मालिका खेळणार आहे.
तर मिताली राजकडे भारताच्या वन-डे संघाचं नेतृत्व सोपवण्यात आलेलं आहे.
हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मंधाना (उप-कर्णधार), मिताली राज, वेदा कृष्णमुर्ती, जेमिया रॉड्रीग्ज, दिप्ती शर्मा, अनुजा पाटील, तानिया भाटिया (यष्टीरक्षक), नुझात परवीन (यष्टीरक्षक), पुनम यादव, राजेश्वरी गायकवाड, झुलन गोस्वामी, शिखा पांडे, पुजा वस्त्राकर, राधा यादव