पाणी संकटावर मात करण्यासाठी इतक्या लाखांची मदत

सध्या दक्षिण आफ्रिकेवर पाण्याचं संकट आहे. त्यामुळे पाण्याच्या बाटल्या पोहोचवण्यासाठी आणि बोअरवले खोदण्यासाठी भारतीय आणि दक्षिण आफ्रिकेच्या संघाने मदत दिली आहे.

shailesh musale शैलेश मुसळे | Updated: Feb 28, 2018, 11:50 AM IST
पाणी संकटावर मात करण्यासाठी इतक्या लाखांची मदत title=

केपटाऊन : सध्या दक्षिण आफ्रिकेवर पाण्याचं संकट आहे. त्यामुळे पाण्याच्या बाटल्या पोहोचवण्यासाठी आणि बोअरवले खोदण्यासाठी भारतीय आणि दक्षिण आफ्रिकेच्या संघाने मदत दिली आहे.

दोन्ही संघाने 8500 डॉलर (5.6 लाख रुपये) दान केले आहेत. टी20 सीरीजच्या तिसऱ्या आणि शेवटच्या सामन्यानंतर भारतीय कर्णधार विराट कोहली आणि दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार फाफ डु प्लेसिसने 1,00,000 रँड (दक्षिण आफ्रिकेची मुद्रा, 5.6 लाख रुपये) ‘द गिफ्ट ऑफ द गिवर्स फाउंडेशनला’ दान केले आहेत. ही  आफ्रिकेमधील सर्वात मोठी आपात्कालीन मदत निधी आहे.

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात खूप जुने संबंध आहेत. दोन्ही देश एकमेकांच्या मदतीसाठी धावून येतात. आजही जुने संबंध असेच टिकून आहेत.  आता खेळाडूंकडूनही जुने संबंध मजबूत करण्याचा प्रयत्न होत आहे.

भारतीय टीमला दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यात टेस्ट सिरीजमध्ये २-१ ने पराऊव स्विकारावा लागला. वनडेमध्ये टीमने दक्षिण आफ्रिकेचा ५-१ने धुव्वा उडवला त्यानंतर २-१ ने टी-20 सिरीजही भारताने जिंकली. आता भारत श्रीलकेंच्या दौऱ्यावर जाणार आहे. जेथे भारत, श्रीलंका आणि बांगलादेशमध्ये सिरीज होणार आहे.