मुंबई : माजी कॅप्टन महेंद्र सिंह धोनीने टेस्ट क्रिकेटमधून संन्यास घेतल्यानंतर त्याच्या भविष्याबद्दल सतत चर्चा होत आहे. मात्र विराट कोहलीचं यावर म्हणणं आहे की....
पुढील तीन महिन्यात अनेक सामने होणार आहेत. ज्यामध्ये कॅप्टन कूल राहिलेल्या महेंद्र सिंह धोनीला आपला सूर पुन्हा एकदा सापडेल. कोहलीला धोनीवर पूर्ण विश्वास आहे की आगामी २४ मॅचमध्ये धोनीचा खेळ पुन्हा एकदा पूर्ववत होईल आणि तो आपल्या फॅन्सची प्रशंसा मिळवेल.
कोहलीने श्रीलंकेच्या विरोधात दुसऱ्या वनडे सामना आधीच्या पत्रकार परिषदेत सांगितले की, या सत्रात आम्हाला खेळांडूंचा खेळ समजून घेण्यास मदत झाली. यामुळे विश्वकपच्या अगोदर आम्हाला आमचा गेम सेट करण्यास मदत होईल. यामुळे समजेल की खास परिस्थितीमध्ये खेळाडूने नेमकं काय करावं?
तसेच या गेमचा फायदा धोनीसारख्या प्लेअरला होईल जो आता टेस्ट क्रिकेट खेळत नाही आहे. आंतरराष्ट्रीय सामन्यात लय मिळवण्यासाठी त्याला फायदा होईल. तसेच आता आम्ही धोनीसह इतर खेळाडूंच्या चांगल्या सवयी विकसित करण्यासाठी वेळ घेत आहोत. तसेच कोहलीचं म्हणणं आहे की, चायनामॅन कुलदीप पवारच्या तुलनेत अक्षर पटेल अधिक उपयोगी क्रिकेटर आहे. आणि हेच कारण आहे की त्याला वन डे च्या अंतिमपर्यंत ठेवण्यात आले.