'वर्ल्ड कप जिंकला पण...', ऑस्ट्रेलियन मीडियाचा खळबळजनक आरोप! म्हणतात, 'ट्रॉफी देताना स्टेडियममध्ये...'

ICC Cricket world cup 2023 :भारताने तयार केलेली खेळपट्टी भारतावरच उलटली, असं 'हेराल्ड सन'ने म्हटलं आहे. पाँटिंगने अहमदाबादच्या खेळपट्टीबाबत भारताच्या रणनीतीवरही प्रश्न उपस्थित केले आहेत.

सौरभ तळेकर | Updated: Nov 20, 2023, 05:49 PM IST
'वर्ल्ड कप जिंकला पण...', ऑस्ट्रेलियन मीडियाचा खळबळजनक आरोप! म्हणतात, 'ट्रॉफी देताना स्टेडियममध्ये...' title=
How Australia media react on IND vs AUS World Cup 2023 Final

Australia media on World Cup Final : ऑस्ट्रेलियाने तब्बल 130 कोटी भारतीयांच्या स्वप्नाचा चुराडा करून वर्ल्ड कपवर सहाव्यांदा नाव (Australia Win World Cup) कोरलं आहे. कांगारूंनी टीम इंडियाचा 6 गडी राखून पराभव केला. ट्रॅव्हिस हेडच्या 137 धावांच्या शतकी खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाचे 241 धावांचं लक्ष्य पूर्ण केलं अन् पुन्हा एकदा ऑस्ट्रेलियाच वनडे क्रिकेटचा बॉस असल्याचं सिद्ध केलं आहे. भारताच्या पराभवानंतर अहमदाबादचं नरेंद्र मोदी स्टेडियम सुन्नन्नं झाल्याचं दिसलं. तर देशभरातील रस्त्यावर देखील शुकशुकाट दिसून आला. अशातच आता वर्ल्ड कप विजयानंतर ऑस्ट्रेलियन मीडियाने भारतावर खळबळजनक आरोप केले आहेत.

ऑस्ट्रेलियन मीडियाची मुजोरी

ऑस्ट्रेलियाच्या विजयानंतर 1 लाख 30 हजारांहून अधिक क्षमतेच्या स्टेडियममध्ये कमिन्सला (Pat Cummins) जेव्हा ट्रॉफी सुपूर्द करण्यात आली. त्यावेळी संपूर्ण स्टेडियम रिकामं होतं. ऑस्ट्रेलियाच्या संघाला रिकाम्या मैदानात ट्रॉफी देण्यात आली, असा आरोप ऑस्ट्रेलियाच्या माध्यमांमधून केला जात आहे. 'द क्रॉनिकल'ने त्यांच्या हेडलाईनमध्ये वर्ल्ड कप फायनलमध्ये खिलाडूवृत्ती न दाखवल्याचा आरोप करत भारतीयांवर टीका केली आहे. ऑस्ट्रेलियाला विश्वचषक ट्रॉफी दिली जात असताना भारतीय खेळाडूंनी दिलेली वागणूक योग्य नव्हती, अशी चर्चा ऑस्ट्रेलियन मीडियामध्ये होताना दिसत आहे. 

भारताने तयार केलेली खेळपट्टी भारतावरच उलटली, असं 'हेराल्ड सन'ने म्हटलं आहे. पाँटिंगने अहमदाबादच्या खेळपट्टीबाबत भारताच्या रणनीतीवरही प्रश्न उपस्थित केले आहेत. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सनेही सामन्याच्या एक दिवस आधी विकेटबाबत चिंता व्यक्त केली होती. भारताचे सत्य समोर आले आहे, अनेक दशकांपासून सुरू असलेली निराशा अजूनही कायम आहे, असं ऑस्ट्रेलियन वृत्तपत्र द टेलिग्राफने म्हटलं आहे. तर स्टेडियममधील प्रेक्षकांची शांतता हा कमिन्स आणि संघासाठी सुवर्णक्षण आहे, असं ऑस्ट्रेलियन वेबसाइट द एजने म्हटलं आहे.

आणखी वाचा - टीम इंडियाच्या पराभवानंतर पाकिस्तानचा Wasim Akram भावूक, म्हणतो 'संधी मिळायला हवी पण...'

पॅट कमिन्स म्हणतो...

मार्नस लॅबुशेन आणि ट्रॅव्हिस हेड या दोघांच्या भागिदारीने ऑस्ट्रेलियाने सामना आपल्या बाजूने पूर्णपणे झुकवला. कमिन्सने त्यांचे कौतुक करताना म्हटले की, मार्नसने अतिशय शांत डोक्याने फलंदाजी केली. तर, ट्रॅव्हिस हेडने सगळ्यात मोठ्या सामन्यात आपला खेळ दाखवून दिला. या खेळाडूंनी निवड समितीने त्यांच्यावर दाखवलेला विश्वास सार्थ केला असल्याचं कमिन्सने विजयानंतर म्हटलं होतं.