IPL मधील महागड्या खेळाडूपेक्षा तीनपट आणि धोनीपेक्षा दुप्पट Tax भरतो विराट कोहली; रक्कम वाचून धक्का बसेल

भारतीय क्रिकेट संघाचा स्टार क्रिकेटर विराट कोहलीने (Virat Kohli) या आर्थिक वर्षात तब्बल 66 कोटींचा कर भरला आहे. कोणत्याही भारतीय खेळाडूने भरलेला हा सर्वाधिक करत असल्याचं वृत्त फॉर्च्यून इंडियाने दिलं आहे.   

शिवराज यादव | Updated: Sep 5, 2024, 02:27 PM IST
IPL मधील महागड्या खेळाडूपेक्षा तीनपट आणि धोनीपेक्षा दुप्पट Tax भरतो विराट कोहली; रक्कम वाचून धक्का बसेल title=

भारतीय क्रिकेट संघाचा स्टार खेळाडू विराट कोहली आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये देशातील सर्वाधिक कर भरणारा खेळाडू ठरला आहे. Fortune India कर भरणारे खेळाडू, सेलिब्रिटी यांची यादी जाहीर केली आहे. रिपोर्टनुसार, विराट कोहलीने 66 कोटींचा कर भरला आहे. विशेष म्हणजे आयपीएलमधील सर्वात महाग खेळाडू मिशेल स्टार्कला मिळालेल्या रकमेच्या तुलनेच विराट कोहलीने भरलेला कर तीन पट आहे. मिशेल स्टार्कला 24.75 कोटीत खरेदी करण्यात आलं होतं. 

सेलिब्रिटी करदात्यांच्या यादीत विराट कोहली पाचव्या स्थानावर आहे. पहिल्या चार स्थानावर शाहरुख खान (92 कोटी), विजय (80 कोटी), सलमान खान (75 कोटी) आणि अमिताभ बच्चन (71 कोटी) आहेत.  श्रीलंकेविरोधातील एकदिवसीय मालिकेनंतर सध्या विश्रांतीवर असलेला विराट कोहली या यादीत इतर खेळाडूंच्या तुलनेत भरपूर पुढे आहे. 

विराट कोहलीनंतर या यादीत महेंद्रसिंग धोनीचा क्रमांक आहे. भारताचा विश्वविजेता कर्णधार महेंद्रसिंग धोनीने 38 कोटीचा कर भरला असून, यादीत सातव्या स्थानी आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतरही धोनी सर्वाधिक कमाई करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत आहे. धोनी सध्या फक्त आयपीएलमध्ये खेळत आहे. पण पुढील आयपीएल हंगामात तो खेळणार आहे की नाही याबाबत साशंकता आहे. 

कोहली आणि धोनीनंतर, मास्ट ब्लास्टर सचिन तेंडुलकर हा सर्वाधिक करदात्यांच्या यादीतील पहिल्या 10 मध्ये स्थान मिळवणारा एकमेव भारतीय खेळाडू आहे. एकदिवसीय आणि कसोटीमध्ये अद्यापही सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम, दोन्ही फॉरमॅटमध्ये सर्वाधिक शतके आणि 200 कसोटी सामने खेळणारा जगातील एकमेव क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने एकूण 28 कोटी इतका कर भरला.

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुली यादीत 12 व्या स्थानी आहे. गांगुलीने 23 कोटींचा कर भरला आहे. तसंच या यादीत हार्दिक पांड्या आणि ऋषभ पंतही आहेत. अष्टपैलू हार्दिक पांड्याने 13 कोटी तर पंतने 10 कोटींचा कर भऱला आहे. 

कोणी किती कर भऱला हे जाणून घ्या - 

शाहरुख खान - 92 कोटी

थलापती विजय - 80 कोटी

सलमान खान - 75 कोटी

अमिताभ बच्चन - 71 कोटी

विराट कोहली - 66 कोटी

अजय देवगण - 42 कोटी

महेंद्रसिंग धोनी - 38 कोटी

रणबीर कपूर - 36 कोटी

सचिन तेंडुलकर - 28 कोटी

ऋतिक रोशन - 28 कोटी

कपिल शर्मा -  26 कोटी

सौरव गांगुली - 23 कोटी

करिना कपूर - 20 कोटी

शाहीद कपूर - 14 कोटी

मोहनलाल - 14 कोटी

अल्लू अर्जून - 14 कोटी

हार्दिक पांड्या - 13 कोटी

कियारा अडवाणी - 12 कोटी

कतरिना कैफ- 11 कोटी

पंकज त्रिपाठी- 11 कोटी

आमीर खान-  10 कोटी

ऋषभ पंत- 10 कोटी