Captain Statement: मी केवळ रेकॉर्डचा विचार...; वर्ल्ड रेकॉर्ड बनवल्यावर रोहित शर्माच्या वक्तव्याने सर्वच हैराण

Rohit Sharma : भारताचा कर्णधार रोहित शर्माने ( Rohit Sharma ) वर्ल्डकपच्या सामन्यात अफगाणिस्तानविरुद्धच्या विक्रमी शतक झळकावलं. या सामन्यात रोहितने ( Rohit Sharma ) 84 बॉल्समध्ये 131 रन्सच्या खेळीत केली सोबतच अनेक विक्रम केले. 

सुरभि जगदीश | Updated: Oct 12, 2023, 07:38 AM IST
Captain Statement: मी केवळ रेकॉर्डचा विचार...; वर्ल्ड रेकॉर्ड बनवल्यावर रोहित शर्माच्या वक्तव्याने सर्वच हैराण title=

Rohit Sharma : दिल्लीच्या अरूण जेटली स्टेडियमवर बुधवारी अफगाणिस्तान विरूद्ध भारत यांच्यात सामना रंगला होता. या सामन्यात रोहित शर्माने ( Rohit Sharma ) तुफान फलंदाजी करत शतक ठोकलं. रोहितने अफगाणिस्तानविरोधात 131 रन्सची खेळी केली. दरम्यान त्याने आपल्या नावे अनेक रेकॉर्डचीही नोंद केली. अफगाणिस्तानचा 8 विकेट्सने पराभव केला. यानंतर रोहितने ( Rohit Sharma ) कर्णधार म्हणून त्याची काय जबाबदारी आहे, यावर भाष्य केलंय.  

रोहितच्या नावे वर्ल्डकपमधील सर्वात जास्त शतकं

भारताचा कर्णधार रोहित शर्माने ( Rohit Sharma ) वर्ल्डकपच्या सामन्यात अफगाणिस्तानविरुद्धच्या विक्रमी शतक झळकावलं. या सामन्यात रोहितने ( Rohit Sharma ) 84 बॉल्समध्ये 131 रन्सच्या खेळीत केली सोबतच अनेक विक्रम केले. ज्यामुळे भारताने अफगाणिस्तानचा 8 विकेट्सने पराभव केला. या काळात, रोहित ( Rohit Sharma ) वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक शतके आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक सिक्स ठोकणारा फलंदाज बनला.

काय म्हणाला रोहित शर्मा

या सामन्यातनंतर टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माला ( Rohit Sharma ) मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्यात आला. यानंतर रोहित म्हणाला की, ही खेळपट्टी फलंदाजीसाठी चांगली होती. माझा नैसर्गिक खेळ खेळण्यासाठी मी स्वतःला आधार देत होतो. मला माहित होतं की, एकदा मी माझी दृष्टी निश्चित केली विकेटवर फलंदाजी करणं सोपं होईल. वर्ल्डकपमध्ये शतक झळकावणं हे विशेष आहे. याबद्दल मी खूप खूश देखील आहे.

रोहित शर्मा ( Rohit Sharma ) पुढे म्हणाला की, "मुळात मी केवळ रेकॉर्डबद्दल जास्त विचार करू इच्छित नाही. कारण मला माहितीये की, अजून बराच पल्ला गाठायचा आहे आणि एकाग्रतेने खेळी करायची आहे. मला माहितीये की, टीमला चांगली सुरुवात करून देणं आणि शक्य तितक्या चांगल्या परिस्थितीत आणणं ही माझी जबाबदारी आहे. हे मी काही काळ केलं असून मला आवडते." 

रोहित शर्मा बनला सिक्सर किंग

अफगाणिस्तान विरूद्धच्या सामन्यात रोहितने सर्वाधिक सिक्सेसचा रेकॉर्ड आपल्या नावे केला आहे. रोहित शर्मा ( Rohit Sharma ) क्रिकेट जगताचा नवा सिक्सर किंग बनला आहे. यावेळी हिटमॅनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक सिक्स मारल्या आहेत. वर्ल्डकप स्पर्धेच्या दुसऱ्याच सामन्यात रोहित शर्माने सर्वाधिक सिक्सचा विक्रम आपल्या नावावर केला आहे.