'मला खरंच कळत नाहीये की...', विजयानंतरही रोहित शर्माच्या वक्तव्याने चाहत्यांचं वाढलं टेन्शन!

वर्ल्डकपमधील पहिल्या विजयानंतर रोहित शर्माच्या प्रतिक्रियेने संपूर्ण देशातील चाहत्यांची चिंता वाढवली आहे. टीम इंडियाने आयरर्लंड विरुद्ध न्यूयॉर्कमधील नासाऊ काउंटी इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर सामना खेळला.

सुरभि जगदीश | Updated: Jun 7, 2024, 04:14 PM IST
'मला खरंच कळत नाहीये की...', विजयानंतरही रोहित शर्माच्या वक्तव्याने चाहत्यांचं वाढलं टेन्शन! title=

Rohit Sharma: भारताच्या टी-20 वर्ल्डकपच्या मिशनला सुरुवात झाली असून बुधवारी आयरलँड विरूद्ध टीम इंडिया यांच्यात सामना रंगला होता. या सामन्यात भारताने 8 विकेट्सने आयरलँडवर विजय मिळवला. वर्ल्डकपमधील पहिल्या विजयानंतर टीम इंडियाचे चाहते फार खूश आहेत. मात्र यावेळी टीमचा कर्णधार रोहित शर्मा फारसा खूश नसल्याचं दिसून आलं होतं. 

वर्ल्डकपमधील पहिल्या विजयानंतर रोहित शर्माच्या प्रतिक्रियेने संपूर्ण देशातील चाहत्यांची चिंता वाढवली आहे. टीम इंडियाने आयरर्लंड विरुद्ध न्यूयॉर्कमधील नासाऊ काउंटी इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर सामना खेळला. या पीचवर वेगवान गोलंदाजांना खूप मदत मिळाली. केवळ भारतीयच नाही तर आयरिश गोलंदाजांनीही या पीचवर चांगला खेळ केल्याचं दिसून आलं.

पहिल्या विजयानंतर काय म्हणाला रोहित शर्मा?

वेगवान गोलंदाजांना चांगली मदत मिळाल्यानंतर रोहित शर्माच्या म्हणण्यानुसार, मला वाटत नाही की, या ठिकाणी चार स्पिनर्स खेळवू शकू. भारतीय टीमने आपल्या 15 सदस्यीय संघात 4 फिरकीपटू आणि फक्त 3 वेगवान गोलंदाजांची निवड केली आहे. त्यामुळे आता ही टीम इंडियासाठी मोठी चूक ठरू शकण्याची शक्यता आहे.

रोहित शर्माने वर्ल्डकपच्या टीम सिलेक्शनंतर सांगितलं होतं की, मला 4 स्पिनर्स हवे आहेत. पण आता न्यूयॉर्कच्या पीचवनुसार त्याचा निर्णय चुकीचा सिद्ध होण्याची शक्यता आहे. मात्र यावेळी ग्रुप स्टेजनंतर टीम इंडिया उर्वरित वेस्ट इंडिजविरुद्ध खेळणार आहे. त्या ठिकाणी जिथे स्पिनर्स खूप उपयुक्त ठरू शकण्याची शक्यता आहे.

रोहितच्या शर्मा म्हणाला की, मला नाही वाटतं की मी या ठिकाणी 4 स्पिनर्स खेळवू शकतो. ज्यावेळी आम्ही टीम सिलेक्शन केलं होतं, तेव्हा मला टीमचं संतुलन राखायचं होतं. या सामन्यात वेगवान गोलंदाज असलेली खेळपट्टी होती आणि त्यानंतर आम्ही दोन स्पिनर्स खेळवण्यात यशस्वी झालो. हे दोघंही ऑलराऊंडर आहेत. खरं सांगायचे तर पीचकडून काय अपेक्षा करावी हे मला कळत नाहीये.

पाकिस्तानविरुद्ध अशीच परिस्थिती असल्यास आम्ही तयारी करू. हा अशा प्रकारचा सामना असणार आहे ज्यामध्ये सर्व 11 खेळाडूंना योगदान द्यावं लागणार आहे, असंही रोहित शर्माने म्हटलं आहे.