दुबई : वर्ल्डकप स्पर्धेची इंग्लंडमध्ये जय्यत तयारी सुरु आहे. आयसीसी देखील वर्ल्डकपसाठीच्या आयोजनासाठी जय्यत तयारी करत आहे. कॉमेंटेटरमुळे सामन्यात आणखी रंगत येते. वर्ल्डकपसाठी आयसीसीने एकूण २४ कॉमेंटेटरची यादी जाहीर केली आहे. यामध्ये विविध देशातील माजी खेळाडूंना तसेच कॉमेंटेटरना संधी देण्यात आली आहे.
भारताकडून एकूण ३ कॉमेंटेटरची निवड करण्यात आली आहे. या ३ पैकी २ कॉमेंटेटर हे मराठी आहेत. यात माजी खेळाडू संजय मांजरेकरचा देखील समावेश आहे. तसेच हर्षा भोगले आणि भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे भारतीय क्रिकेट रसिकांनी या तिन्ही कॉमेंटेटर कॉमेंट्री ऐकण्याची संधी मिळणार आहे.
वर्ल्डकप स्पर्धेला येत्या ३० मे पासून सुरुवात होत आहे. टीम इंडिया वर्ल्डकपमधील आपला पहिला सामना ५ जून ला खेळणार आहे. हा सामाना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळला जाणार आहे.
सौरभ गांगुली, संजय मांजरेकर, हर्षा भोगले, शॉन पॉलक, मायकल स्लेटर, मार्क निकोलस, मायकल होल्डींग, इशा गुहा, पॉमी एमबान्ग्वा, मायकल अथर्टन, अॅलिसन मिचेल, ब्रेंडन मॅकलम, ग्रॅम स्मिथ, वासिम अक्रम, रमीझ राजा, अथर अली खान, इयान वार्ड, सायमन डुल, इयन स्मिथ, नासिर हुसेन, इयन बिशॉप, मेलेनी जोन्स आणि कुमार संगकारा.
५ जून- भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका
९ जून- भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया
१३ जून- भारत विरुद्ध न्यूझीलंड
१६ जून- भारत विरुद्ध पाकिस्तान
२२ जून- भारत विरुद्ध अफगाणिस्तान
२७ जून- भारत विरुद्ध वेस्ट इंडिज
३० जून- भारत विरुद्ध इंग्लंड
२ जुलै- भारत विरुद्ध बांगलादेश
६ जुलै- भारत विरुद्ध श्रीलंका