दुबई : जगभरामध्ये कोरोना व्हायरसमुळे मोठं संकट उभं राहिलं आहे. याचा फटका आता क्रिकेटला बसला आहे. आयसीसीने या कारणामुळे क्रिकेट वर्ल्ड कप चॅलेंज लीग ए स्पर्धेची तारीख पुढे ढकलली आहे. जगभरामध्ये ९ हजार लोकांना कोरोना व्हायरसची लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे. भारतामध्ये आतापर्यंत ३१ जणांना कोरोना झाल्याची माहिती समोर आली आहे.
क्रिकेट वर्ल्ड कप चॅलेंज लीग एमध्ये कॅनडा, डेन्मार्क, मलेशिया, कतार, सिंगापूर आणि वानुआतू या टीम सहभागी होणार होत्या. ही स्पर्धा आता वर्षाच्या शेवटी होईल, अशी अपेक्षा आयसीसीने व्यक्त केली आहे. कोरोना व्हायरसमुळे आम्ही ही स्पर्धा पुढे ढकलण्याचा कठीण निर्णय घेतल्याची प्रतिक्रिया आयसीसीने हेड ऑफ इव्हेंट्स क्रिस टेटले यांनी दिली.