नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद म्हणजेच आयसीसीने आपल्या नियमांत एक महत्वपूर्ण बदल केला आहे.
फुटबॉल असो, हॉकी असो किंवा क्रिकेटचं मैदान असो खेळ सुरु असताना अनेकदा वाद-विवाद होतात. फुटबॉल किंवा हॉकीच्या मैदानात गैरवर्तन करणाऱ्या प्लेअरला मैदानातून बाहेरचा रस्ता दाखविण्याचा नियम आहे. मात्र, क्रिकेटमध्ये तसा कुठलाही नियम नव्हता. पण आता आयसीसीनेही महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
क्रिकेटच्या मैदानात गैरवर्तन किंवा बेशिस्त दाखविणाऱ्या प्लेअरला रेड कार्ड दाखविण्याचा अधिकार अंपायरला देण्यात आला आहे. म्हणजेच फुटबॉलच्या मैदानात ज्या प्रमाणे गैरवर्तन करणाऱ्याला प्लेअरला रेड कार्ड दाखवत मॅचमधून बाहेर काढण्यात येतं त्याचप्रमाणे क्रिकेटमध्येही घडणार आहे.
आयसीसीने म्हटलं आहे की, एखादा प्लेअर मैदानात गैरवर्तन करेल तर त्याला रेड कार्ड दाखवत मैदानातून बाहेर काढण्यात येईल.
मैदानात होणारी शिवीगाळ आणि वाद-विवाद रोखण्यासाठी आयसीसीने हा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे.