NZ vs AFG | नजीबुल्लाह झारदानची शानदार खेळी, न्यूझीलंडला विजयासाठी 125 धावांचे आव्हान

अफगाणिस्तानकडून (Afghanistan) नजीबुल्लाह झारदानने (Najibullah Zadran) 73 धावांची शानदार खेळी केली.  

Updated: Nov 7, 2021, 05:18 PM IST
NZ vs AFG | नजीबुल्लाह झारदानची शानदार खेळी, न्यूझीलंडला विजयासाठी 125 धावांचे आव्हान title=

अबुधाबी : अफगाणिस्तानने (Afghanistan) न्यूझीलंडला (New Zealand) विजयासाठी 125 धावांचे आव्हान दिले आहे. अफगाणिस्तानने निर्धारित 20 ओव्हरमध्ये 8 विकेट्स गमावून 124 धावा केल्या. अफगाणिस्तानकडून नजीबुल्लाह झारदानने (Najibullah Zadran) 73 धावांची शानदार खेळी केली. तर न्यूझीलंडकडून ट्रेन्ट बोल्टने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. तर टीम साऊथीने 2 विकेट्स घेत बोल्टला चांगली साथ दिली. (icc t 20 world cup 2021 Afghanistan set 125 runs target for new Zealand at abu dhabi) 

न्यूझीलंड : मार्टिन गुप्टिल, डेरील मिचेल, केन विलियम्सन, डेवन कॉनवे, ग्लेन फिलिप्स, जेम्स नीशाम, मिचेल सँटनर, एडम मिल्ने, टीम साउथी, ईश सोढी आणि ट्रेंट बोल्ट. 

अफगाणिस्तान : हजरातुल्लाह जझई, मोहम्मद शहजाद, रहमानुल्लाह गुरबाज, नाजीबुल्लाह जादरान, गुलबदैन नईब, मोहम्मद नबी, करीम जन्नत, राशिद खान, नवीन उल हक, हामिद हसन आणि मुजीब उर रहमान.