टेस्ट रॅकिंगमध्ये अश्विनची घसरण, कोहली-पुजारा त्याच स्थानावर

आयसीसीनं नुकत्याच जाहीर केलेल्या टेस्ट रॅकिंगमध्ये भारताचा ऑफ स्पिनर आर.अश्विन तिसऱ्या क्रमांकावर फेकला गेला आहे. 

Updated: Jul 20, 2017, 10:37 PM IST
टेस्ट रॅकिंगमध्ये अश्विनची घसरण, कोहली-पुजारा त्याच स्थानावर  title=

मुंबई : आयसीसीनं नुकत्याच जाहीर केलेल्या टेस्ट रॅकिंगमध्ये भारताचा ऑफ स्पिनर आर.अश्विन तिसऱ्या क्रमांकावर फेकला गेला आहे. झिम्बाब्वेविरुद्धच्या टेस्टमध्ये दहा विकेट घेणारा रंगना हेराथ दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. तर भारताचा स्पिनर रवींद्र जडेजा पहिल्या क्रमांकावर कायम आहे.

बॅट्समनच्या रॅकिंगमध्ये स्टीव्ह स्मिथ पहिल्या क्रमांकावर कायम आहे. स्मिथनंतर दक्षिण आफ्रिकेचा हशीम अमला दुसऱ्या क्रमांकावर आहे. भारताचा चेतेश्वर पुजारा चौथ्या तर विराट कोहली पाचव्या क्रमांकावर कायम आहे. ऑल राऊंडरच्या यादीमध्ये बांग्लादेशचा शाकीब अल हसन पहिल्या क्रमांकावर आहे तर रवींद्र जडेजा दुसऱ्या आणि आर. अश्विन तिसऱ्या क्रमांकावर आहे.

टीम रॅकिंगमध्ये भारत अव्वल क्रमांकावर कायम आहे. दुसऱ्या क्रमांकावर दक्षिण आफ्रिका आणि तिसऱ्या क्रमांकावर ऑस्ट्रेलिया आहे. यानंतर इंग्लंड, न्यूझीलंड, पाकिस्तान, श्रीलंका, वेस्ट इंडिज, बांग्लादेश आणि झिम्बाब्वेचा नंबर लागतो.