Maratha Reservation Warning: मराठा आरक्षणाची मागणी करणारे आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी शांतता रॅलीला सुरुवात केली आहे. जरांगे पाटील आज हिंगोलीमध्ये असून या ठिकाणी समाजबांधावांना उद्देशून त्यांनी जाहीर भाषण केलं. मनोज जरांगे-पाटील यांनी आपल्या भाषणामध्ये छगन भुजबळांचं ऐकून मराठ्यांवर अन्याय केला तर 288 मतदरासंघांमधून सत्ताधाऱ्यांचा एकही उमेदवार निवडून येणार नाही, असा थेट इशाराच दिला आहे.
"तुम्हाला बघून आज माझं मन भरून आलं आहे. सकाळपासून आपण भूक हरवून उपस्थित राहिलात यासाठी मी आपले आभार मानतो," असं म्हणत जरांगेंनी आपल्या भाषणाला सुरुवात केली. "एकट्या छगन भुजबळांचं ऐकून मराठ्यावर अन्याय केला तर याद राखा," असा इशारा जरांगेंनी आपल्या भाषणातून दिला. "भुजबळांचं ऐकून जर मराठयांवर अन्याय केला तर 288 मतदारसंघातून सरकारचा एक ही उमेदवार निवडून येऊ देणार नाही," असं जरांगे आपल्या भाषणात म्हणाले. "सरकारने मराठ्यांचा आक्रोश समजून घ्यायला हवा. छगन भुजबळांचं ऐकून जर अन्याय केला तर लोकसभेची पुनरावृत्ती होईल. पुन्हा मला म्हणायचं नाही, असं कसं झालं. मग मांडीला मांडी लावून बसतात आणि म्हणतात पाटील फक्त पाडा म्हणून नका. पाडा मराठे म्हटले तर तुमची ही अवस्था झाली," असा टोला जरांगेंनी सत्ताधाऱ्यांना लगावला आहे.
"मराठा समाजाला आरक्षण मिळावे एवढीच आमची अपेक्षा आहे. राजकरण करायची आमची इच्छा नाही. जर आम्हाला राजकारणाकडे ओढलं तर तुमचं तुम्ही बघा," असा इशारा जरांगेंनी दिला. तसेच पुढे बोलताना, "सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्या. 1967 ला 180 जाती आरक्षणाखाली घातल्या. त्यात 83 क्रमांकाला कुणबी आहे. व्यवसायाला आरक्षण दिलं गेलं. माळी समाजाची जात 1967 आरक्षणाअंतर्गत घातली. एका माळी समाजातील सर्व पोटजाती आरक्षणात घातल्या. 83 क्रमांकाला कुणबी आहेत. विदर्भातील मराठा समाज त्यात आहे. आमचा रोटी-बेटी व्यवहार हकतो. त्यांना जर व्यवसायावर आरक्षण दिलं तर आमचा व्यवसाय ही शेतीच आहे. 180 जातीच्या पोट जाती म्हणून 350 जाती यांनी आरक्षणात घतल्यात," असं जरांगे म्हणाले.
"कैकाडी समाजाच शिष्टमंडळ मला भेटले. आमची एकच जात आहे. विदर्भात ते एससी आरक्षणात आहेत. विदर्भातील कैकाडी मराठवाड्यात आले की जात बदलते. आरक्षण मिळत नसल्याने मराठ्यांच्या मुलांना उच्च शिक्षण मिळत नाही. नोकरी लागत नाही. 13 तारखेच्या आत मराठ्यांना आरक्षण द्या. तसं झालं नाही तर झालेला निर्णय तुम्हाला झेपायचा नाही," असं जरांगे सरकारला इशारा देताना म्हणालेत.
नक्की वाचा >> बारामतीत विधानसभेला काका विरुद्ध पुतण्या? सुप्रियांचं सूचक विधान; म्हणाल्या, 'कोणतीही...'
13 तारखेपर्यंत आरक्षण मिळालं नाही तर आपली मुंबईला बैठक होईल. यावेळी तुम्ही म्हणालं तसं मागच्यावेळी मी परत आलो आता येणार नाही. मग छगन भुजबळला कडेवर घेऊन बसा," असा टोला जरांगेंनी लगावला. "छगन भुजबळ आता मुकादम झालाय. याला हे बोल, त्याला ते बोल. आंतरवालीत आंदोलन सुरू असताना पुढे आणून बसवलं अन् म्हणतात जातीयवाद नाही झाला पाहिजे. माय बाप हो, तुम्हाला हात जोडून विंनती आहे, हे राजकारणी लोक लावून देतील. गोरगरीब ओबीसींच्या अंगावर जाऊ नका. ओबीसींनो मराठ्यांचा पण अंगावर जाऊ नका. केसेस झाल्यावर कुणी सातबारा घेऊन येत नाही. हे छगन भुजबळला समजणार नाही," असं जरांगे म्हणाले.
"काहीजण म्हणतात मला घटना कळत नाही. शिकलेलच नाही, मी चवथी शिकलेला नाही. पण दीड कोटी मराठा आरक्षणात घातला का नाही? काहीजण म्हणतात मी मिथुन आहे. बरं मी मिथुन आहे पण मी खुटी ठोकली की नाही?" असा सवाल जरांगेनी विचारला.