दुबई : आयसीसी अंडर १९ वर्ल्डकपचे वेळापत्रक जाहीर करण्यात आलेय. या वर्ल्डकपमध्ये तीन वेळा जेतेपद मिळवणाऱ्या भारताचा सलामीचा सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध रंगणार आहे.
पुढील वर्षी १३ जानेवारी ते ३ फेब्रुवारीदरम्यान न्यूझीलंडमध्ये ही स्पर्धा रंगणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलियासह ग्रुप बीमध्ये झिम्बाब्वे, पापुआ न्यू गिनी हे संघ आहेत.
न्यूझीलंडमधील ख्राईस्टचर्च, क्वीन्सटाऊन, टॉरंगा आणि वँगरेई येथे सामने सामने खेळवले जाणार आहेत.
ग्रुप एमध्ये वेस्ट इंडिज, न्यूझीलंडसह २०१२मधील चॅम्पियन दक्षिण आफ्रिका आणि केनिया हे संघ आहेत. कसोटी खेळणाऱ्या १० देशांना यामध्ये प्रवेश मिळाला आहे. ग्रुप सीमध्ये बांगलादेश, कॅनडा, इंग्लंड आणि नामिबिया हे देश आहेत. तर दोन वेळा चॅम्पियन ठरलेला पाकिस्तान, श्रीलंका, अफगाणिस्तान आणि आर्यंलड ग्रुप डीमध्ये आहेत.
प्रत्येक ग्रुपमधील दोन सर्वेोत्तम संघ सुपर लीगमध्ये पोहोचतील. सुपर लीगमध्ये क्वार्टरफायनल्स, सेमीफायनल आणि फायनल अशा फेऱ्या रंगतील. २९ आणि ३० जानेवारीला सेमीफायनल खेळवल्या जातील. तर ३ फेब्रुवारीला अंतिम सामना रंगेल.
ग्रुप ए – वेस्ट इंडिज, दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड, केनिया
ग्रुप बी – भारत, झिम्बाब्वे, ऑस्ट्रेलिया, पापुआ न्यू गिनी
ग्रुप सी – बांगलादेश, इंग्लंड, नामिबीया, कॅनडा
ग्रुप डी – श्रीलंका, पाकिस्तान, अफगाणिस्तान, आयर्लंड