लंडन : इंग्लड आणि वेल्समध्ये सुरू असलेल्या वुमन क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये भारतीय महिलांनी सुरूवातीलचे दोन्ही सामने जिंकून पॉइंट्स टेबलमध्ये दुसरे स्थान पटकावले आहे.
या स्पर्धेत एकूण ८ संघांनी भाग घेतला आहे. पुरूषांच्या १९९२ मध्ये झालेल्या वर्ल्ड कपप्रमाणे सर्व संघ प्रत्येकाशी एक सामना खेळणार आहे. म्हणजे भारत ७ सामने खेळणार आहेत. त्यात सर्वाधिक सामने जिंकणारे पहिले चार संघांमध्ये सेमी फायनल होणार आहे.
सध्या ऑस्ट्रेलिया दोन सामने जिंकून रन रेटमुळे पहिल्या स्थानावर आहे. दुसऱ्या स्थानावर भारत आहे. तिसऱ्या स्थानावर न्यूझीलंड आणि चौथ्या स्थानावर दक्षिण आफ्रिका आहे. इंग्लड, वेस्ट इंडिज, श्रीलंका आणि पाकिस्तान,अनुक्रमे पाच ते आठ स्थानावर आहेत.