Team India Expected Playing 11 vs ENG : टीम इंडियाच्या 'मिशन वर्ल्ड कप'चा पुढचा सामना इंग्लंडविरुद्ध (India vs England) खेळला जाणार आहे. लखनऊच्या एकाना क्रिकेट स्टेडिअममध्ये येत्या रविवारी म्हणजे 29 ऑक्टोबरला हा सामना खेळवला जाणार असून भारतीय वेळेनुसार दुपारी दोन वाजता सामन्याला सुरुवात होईल. टीम इंडियाने (Team India) सलग पाच सामने जिंकलेत, त्यामुळे टीम इंडियाचं सेमीफायनलचं स्थान जवळपास निश्चित मानलं जातंय. तर इंग्लंडला पाच पैकी चार सामन्यात पराभव पत्करावा लागलाय. त्यामुळे इंग्लंडचं स्पर्धेतील आव्हान जवळपास संपुष्टात आलंय.
टीम इंडियाची प्लेईंग इलेव्हन
इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात टीम इंडियाच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये (Playing XI) मोठे बदल होण्याची शक्यता आहे. टीम इंडियाचा ऑलराऊंडर हार्दिक पांड्या दुखापतीमुळे पुढच्या तीन सामन्यांना मुकणार आहे. त्यामुळे इंग्लंडविरुद्धच्या सामन्यातही तो खेळणार नाही. हार्दिक पांड्याच्या पायाला दुखापत झाली असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत.
फलंदाजी टीमचं बलस्थान
आतापर्यंत झालेल्या सामन्यात फलंदाजी टीम इंडियाचं बलस्थान ठरली आहे. विशेषत: कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली आणि केएल राहुल जबरदस्त फॉर्मात आहेत. त्यामुळे इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात फलंदाजीच्या क्रमवारीत कर्णधार रोहित शर्मा फारसे बदल करण्याची शक्यता कमीच आहे. शुभमन गिल रोहित शर्माबरोबर डावाची सुरुवात करेल. तर श्रेयस अय्यर आणि सुर्यकुमार यादव मधल्या फळीची जबाबादीर सांभाळतील.
ऑलराऊंडर खेळाडूंच्या यादीत रवींद्र जडेजा खेळणं निश्चित आहे. याशिवाय आर अश्विनला संधी मिळण्याची शक्यता आहे. हार्दिक पांड्याची जागा भरुन काढण्यासाठी आर अश्विन हा टीमसमोर चांगला पर्याय आहे. अश्विन अनुभवी गोलंदाज आहे शिवाय आठव्या क्रमांकावर तो उपयुक्त फलंदाजही ठरला आहे. त्याच्या जोडीला कुलदीप यादव संघात असेल.
हा खेळाडू ठरणार हुकमी एक्का
न्यूझीलंडविरुद्ध पाच विकेट घेणारा वेगवागन गोलंदाज मोहम्मद शमी पुन्हा एकदा टीम इंडियासाठी हुकमी एक्का ठरु शकतो. त्यामुळे त्याला प्लेईंग इलेव्हनमधून बाहेर बसवण्याच कर्णधार रोहित शर्मा विचारही करणार नाही. लखनऊच्या खेळपट्टीवर शमी इंग्लंडविरुद्ध पुन्हा कर्दनकाळ ठरु शकतो. त्याच्या जोडीला जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज असतील.
टीम इंडियाची संभाव्य प्लेईंग इलेव्हन
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव/रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज.