मुंबई : टी-२० क्रिकेटच्या इतिहासात सगळ्यात कमी स्कोअरची नोंद झाली आहे. आशिया खंडातल्या आयसीसी वर्ल्ड टी-२० क्वालिफायर स्पर्धेदरम्यान हा लाजीरवाणा रेकॉर्ड झाला आहे. मलेशियाविरुद्धच्या मॅचमध्ये म्यानमारनं १०.१ ओव्हरमध्ये ८ विकेट गमावून ९ रन केले. मलेशियाचा डावखुरा स्पिनर पवनदीप सिंग यानं म्यानमारच्या ५ विकेट घेतल्या. ४ ओव्हरमध्ये पवनदीपनं फक्त १ रन दिली. पवनदीपनं ४ ओव्हरमध्ये ३ मेडन ओव्हर टाकल्या.
मलेशियाचा वायके को आऊंग मलेशियाचा सर्वाधिक रन करणारा खेळाडू होता. आऊंगनं १२ बॉलमध्ये ३ रन केले. म्यानमारचे ५ बॅट्समन शून्यवर आऊट झाले तर सहावा बॅट्समन शून्यवर असताना पाऊस आला. यामुळे म्यानमारची इनिंग संपली आणि मलेशियाला विजयासाठी डकवर्थ लुईस नियमाप्रमाणे ६ रनची आवश्यकता होती.
६ रनचा पाठलाग करत असताना मलेशियाची सुरुवातही खराब झाली. म्यानमारचा बॉलर पेईंग दानूनं दोन्ही ओपनरना शून्यवरच माघारी पाठवलं. पण यानंतर सुहान अलगारत्नमनं इनिंगच्या दहाव्या बॉलला सिक्स मारून मलेशियाला जिंकवलं. या मॅचमधली ही एकमेव सिक्स होती.
आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये नेदरलंड्सच्या नावावर सगळ्यात कमी स्कोअरची नोंद आहे. २०१४ साली बांगलादेशमध्ये झालेल्या टी-२० वर्ल्ड कपवेळी नेदरलंड्सनं श्रीलंकेविरुद्ध १०.३ ओव्हरमध्ये ३९ रन केले होते.
4 overs
3 maidens
1 run
wickets!What a spell by @MalaysiaCricket's Pavandeep Singh in their win against Myanmar at the @WorldT20 Asia B Qualifier! pic.twitter.com/Po2DIadwJ5
— ICC (@ICC) October 9, 2018