बायकोवर लक्ष ठेवण्यासाठी रोहित शर्मा वापरतो दुर्बीण; रितिकाने बिंग फोडलं

हिटमॅन रोहित शर्मा नक्की दुर्बिणीतून काय बघतोय? रितिका म्हणते...

Updated: Jun 21, 2021, 02:38 PM IST
बायकोवर लक्ष ठेवण्यासाठी रोहित शर्मा वापरतो दुर्बीण; रितिकाने बिंग फोडलं

मुंबई: भारत विरुद्ध न्यूझीलंड वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना सुरू आहे. तिसऱ्या सामन्या अखेरपर्यंत टीम इंडियाने 217 ऑलआऊट तर न्यूझीलंडने 101 धावा आणि 2 गडी बाद असा स्कोअर केला होता. आता चौथ्या दिवसाचा सामना सुरू होण्याआधी रोहित शर्मा मात्र तुफान चर्चेत आला आहे. याचं कारण तितकंच खास आहे. 

रोहित शर्मा दुर्बिणीतून स्टेडियममधून पाहात असल्याचा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या फोटोवर सोशल मीडियावर तुफान कमेंट्सचा पाऊस पडत असतानाच पत्नी रितिकाने मात्र रोहित शर्माची फिरकी घेतली आहे. रोहित शर्माच्या कारनाम्याचं खट्याळपणे बिंग फोडलं आहे. 

इन्स्टाग्रामवर तिने फोटो शेअर करत रोहित नक्की सामना पाहातोय की आमच्यावर लक्ष ठेवण्याचा प्रयत्न करतोय असं म्हणत रोहित शर्माच्या फोटोवर फिरकी घेतली आहे. तिच्या या इन्स्टा स्टेटसवरही चाहत्यांनी खूप कमेंट्स केल्या आहेत. 

रितिकाने केलेल्या ट्रोलमुळे अनेकांना हसूही आवरलं नाही. तर रोहित शर्माचा हा फोटो चांगलाच सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यासाठी टीम इंडियाचे खेळाडू आपल्या कुटुंबासोबत इंग्लंडमध्ये आले आहेत. क्रिकेटपटूच्या कुटुंबियांना मात्र कोरोना प्रोटोकॉलनुसार ड्रेसिंग रूममध्ये येण्याची परवानगी नाही. त्यामुळे रोहित शर्मा दुर्बिणीतून आपल्या पत्नीला पाहात असावा असाही कयास सोशल मीडियावर चर्चेदरम्यान लावण्यात आला आहे.