ICC WTC Final: भर मैदानात Mohammed Shami असा आला की, सर्वांना हसू अनावर

भर मैदानात शमीला असं पाहून सगळ्यांना हसू अनावर...

Updated: Jun 23, 2021, 06:42 AM IST
ICC WTC Final: भर मैदानात  Mohammed Shami असा आला की, सर्वांना हसू अनावर

मुंबई : भारत आणि न्यूझीलंड (India vs New Zealand) दरम्यान सुरु असलेल्या आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियन (ICC World Test Championship Final)  सामन्यात ५ व्या दिवशी मोहम्मद शमी (Mohammed Shami) याने चांगली गोलंदाजी करत महत्त्वाच्या विकेट घेतल्या. पण या सोबत तो आणखी एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आला.

साउथम्पटन (Southampton) मध्ये ५ व्या दिवसाचा खेळ सुरु होण्याआधी पाऊस झाला. पण नंतर पुन्हा उन्ह पडल्यानंतर मोहम्मद शमी (Mohammed Shami)आपल्या खेळाडूंसोबत मैदानावर आला. पण जेव्हा तो आला तेव्हा त्याने अंगाला पांढरा टॉवेल लावला होता. त्यामुळे तो कॅमेऱ्यात कैद झाला आणि मैदानावर एकच हशा पिकला.

मोहम्मद शमी (Mohammed Shami) चा हा फोटो सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे. त्यावर अनेक प्रतिक्रिया आणि जोक्स व्हायरल होत आहेत.