'रोनाल्डोसारखं जगता आलं तर...', विराट कोहली सर्वात पहिली करणार ही गोष्ट

'तो' विराट म्हणून झोपला आणि रोनाल्डो होऊन उठला... विराट कोहलीसोबत हे काय घडलं?

Updated: Apr 5, 2022, 03:02 PM IST
'रोनाल्डोसारखं जगता आलं तर...', विराट कोहली सर्वात पहिली करणार ही गोष्ट title=

मुंबई: आपल्याला आपल्या आवडत्या व्यक्तीसारखं व्हायला संधी मिळाली तर किती आनंद होईल ना. टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहलीला असाच एक प्रश्न विचारला होता. त्यावर कोहलीनं भन्नाट उत्तर दिलं आहे. हे उत्तर ऐकून तुम्हीही थक्क व्हाल.

33 वर्षांच्या विराट कोहलीनं ख्रिस्तियानो रोनाल्डो बद्दल मोठी प्रतिक्रिया दिली आहे. त्याचं उत्तर मजेशीर पण तेवढंच भारी होतं. जेव्हा कोहलीला विचारण्यात आलं की तुला कोणता खेळाडू आवडतो आणि त्याच्यासारखं जर तू झोपेतून उठलास तर तुझी प्रतिक्रिया काय असेल?

यावर कोहलीनं फार सुंदर उत्तर दिलं. कोहली म्हणाला मला ख्रिस्तियानो रोनाल्डो फार आवडतो. मी जर झोपेतून उठताना डोनाल्डो बनलो तर मी सर्वात आधी माझ्या मेंदूचं स्कॅनिंग करून घेईन. यामागे एक खास कारण आहे. 

रोनाल्डो एवढी सगळी मानसिक शक्ती आणि चेहऱ्यावरचं हसू कुठून आणतो याची उत्सुकता माझ्या मनात आहे. विराट कोहलीनं हे उत्तर दिलं आहे. थोडं मजेशीर असलं तरी कोहलीला त्याच्या रोजच्या हसण्यामागचं रहस्य आणि ती ऊर्जा आपल्यामध्ये आणायची आहे असं यावरून दिसत आहे. 

बंगळुरू टीमने आतापर्यंत आयपीएलमध्ये दोन सामने खेळले. या सामन्यात एक सामना गमवला तर एक सामना जिंकला आहे. फाफ ड्यु प्लेसिस बंगळुरूचं  कर्णधारपद सांभाळत आहे. राजस्थान विरुद्ध बंगळुरू आज सामना होणार आहे.