Ind Vs Sa: पहिल्या टेस्टमध्ये टीम इंडियाने जिंकला टॉस, असं आहे प्लेईंग 11

सेंच्युरियनमध्ये खेळल्या जाणाऱ्या पहिल्या कसोटीत टीम इंडियाने टॉस जिंकला आहे.

Updated: Dec 26, 2021, 01:28 PM IST
Ind Vs Sa: पहिल्या टेस्टमध्ये टीम इंडियाने जिंकला टॉस, असं आहे प्लेईंग 11 title=

दिल्ली : आजपासून दक्षिण आफ्रिका विरूद्ध भारत यांच्याच आजपासून पहिली कसोटी खेळली जाणार आहे. सेंच्युरियनमध्ये खेळल्या जाणाऱ्या पहिल्या कसोटीत टीम इंडियाने टॉस जिंकला आहे. विराट कोहलीने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. यासोबत टीम इंडियाचं प्लेईंग इलेव्हेन देखील जाहीर करण्यात आलं आहे.

दरम्यान प्लेईंग 11 मध्ये मराठमोळा अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा यांचा समावेश करण्यात आलेला आहे. या दोन्ही फलंदाजांना ही शेवटची संधी देण्यात आली आहे. त्यामुळे आता अजिंक्य रहाणे संधीचं सोनं करणार का हा प्रश्न सर्वांसमोर आहे.

माजी उपकर्णधार रहाणे गेल्या 12 महिन्यांत त्याच्या खेळाची छाप पाडण्यात अपयशी ठरला आहे. रहाणेने यावर्षी 12 कसोटी सामन्यांमध्ये 19.57 च्या सरासरीने 411 धावा केल्या आहेत.

 

हिल्या टेस्टवर पावसाचं सावट

पहिल्या कसोटीत पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. पहिल्या दोन दिवसांत जोरदार पाऊस आणि वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे. शिवाय पाचव्या दिवशीही पाऊस पडू शकतो.

पहिल्या टेस्टसाठी प्लेईंग 11

केएल राहुल, मयंक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे, ऋषभ पंत (विकेटकीपर), शार्दुल ठाकुर, रविचंद्रन अश्विन, मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह.